आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्शीत शस्त्राच्या धाकाने लग्नघरी दरोडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - लग्नघरी सशस्त्र आठ दरोडेखोरांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह ९० हजारांचा ऐवज लुटून नेल्याची घटना शहराजवळील नागोबाचीवाडी येथे गुरुवारी उघडकीस आली. दरम्यान, दरोडेखोरांच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

येथील हुमायून शेख यांच्या मुलीचे २३ जानेवारी रोजी लग्न आहे. त्यामुळे त्यांच्या घरी पाहुणे मंडळी आली आहेत. सर्वजण जेवण आटोपून बुधवारी रात्री बाराच्या सुमारास झोपी गेले.
महिला घरात झोपल्या तर हुमायून व त्यांचे मेव्हणे दोघेही घराबाहेर झोपले होते. पहाटे पावणेतीनच्या सुमारास दरोडेखोरांनी त्यांना शस्त्रांचा धाक दाखवत घराचा दरवाजा उघडण्यास भाग पाडले. तसेच, दरोडेखोरांनी हुमायून यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. घरातील कर्णफुले, गंठण, मंगळसूत्र, गळसर असा एकूण २८ ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि रोकड लुटले. त्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या लगतचे दत्तात्रय देशमाने गुरव यांच्या घराकडे मोर्चा वळवला. शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या घरातील ११०० ची रोकड व मोबाइल हँडसेट आणि रशीद मोमीन यांच्या घरातून सात ग्रॅमचे सोन्याचे दागिने लुटले.