आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rule Correcting After Cooperative Laws : Dilip Mane

सहकार कायद्यानंतरच नियमात दुरुस्ती : दिलीप माने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - केंद्र सरकारने सहकारी कायद्यामध्ये कलम 97 नुसार घटना दुरुस्ती केली असून हे विधेयक अद्याप राज्याच्या विधिमंडळात मंजूर झालेले नाही. विधिमंडळात विधेयकावर चर्चा, बदल, सूचना होऊन ते संमत झाल्यानंतरच याबाबत निर्णय घेण्याचा ठराव बँकेच्या सर्वसाधारण सभेत झाल्याची माहिती चेअरमन, आमदार दिलीप माने यांनी दिली.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वसाधारण विशेष बैठक शनिवारी बँकेच्या सभागृहात चेअरमन माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्हाईस चेअरमन बबन आवताडे, संचालक आमदार दिलीप सोपल, एस. एम. पाटील, बबनराव शिंदे, सिद्रामप्पा पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप तसेच सुरेश हसापुरे, सरव्यवस्थापक एन. डी. पाटील, व्यवस्थापक के. व्ही. मोटे आदी उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणानुसार सध्या बँकेच्या संचालक मंडळात 11 सोसायटी, 2 महिला, ओबीसी, एससी, एनटीचे प्रत्येकी एक असे एकूण 16 संचालक असणे अंतिम आहे. दूध संघ, प्रक्रिया, पतसंस्था, साखर कारखाने, वैयक्तिक मतदार संघ याबाबतचा निर्णय असून बँकांना जास्तीत जास्त 21 पर्यंत अधिकार आहे. बँकेची नियमित बैठकही झाल्याचे त्यांनी सांगितले.