आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताधारी नगरसेवकाची परिवहनवर आगपाखड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेत मागील २५ वर्षांपासून सत्तेत असलेले आणि परिवहन कामगार संघटनेचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया यांनी परिवहनच्या कारभारावर आगपाखड करत आगामी तीन वर्षांत ते खाते आर्थिक संकटात येईल, असे भाकित व्यक्त केले. परिवहन व्यवस्थापकांनी १५ वर्षांचा आराखडा तयार करण्याचा सल्लाही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी दिला.

दोन कोटींची आवश्यकता
१० व्हाॅल्वो, ३५ मिनीबस, ९९ मोठ्या अशा १४४ बस असून, आणखी ५६ बस येणार आहेत. ११० बस मार्गावर आहेत. दरमहा दोन कोटी आवश्यकता असून, तूर्त १.८० कोटी उत्पन्न मिळते. आता बस नवीन असल्याने दुरुस्ती खर्च नाही. आगामी तीन वर्षांत दुरुस्ती वाढेल आणि कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केल्यास दरमहा ८० लाख रुपये वेतन वाढेल. त्यामुळे परिवहन पुढील तीन वर्षांत आर्थिक संकटात येईल.

कामकरू देत नाही
मनपापरिवहन व्यवस्थापकावर लोकप्रतिनिधी बेकायदा कामाचा दबाव टाकतात. ते बेकायदा काम त्याने केले नाही तर परिवहन व्यवस्थापकास टार्गेट करून त्यांच्या कामात अडचणी वाढवण्याचे प्रयत्न केले जातात, अशी चर्चा मनपा वर्तुळात होत आहे.

बेरिया म्हणाले, हे करा
कामचुकार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे, चोऱ्या करणाऱ्यांवर लगाम घालावा, संगणक प्रणाली सुरू करावी, बसच्या उत्पन्नाचे मार्ग शोधावे, कायमस्वरूपी परिवहन व्यवस्थापक नेमावा.

योग्य नियोजन करण्याची गरज
परिवहनचेउत्पन्न वाढवण्यासाठी परिवहन विभागाने १५ वर्षांचा आराखडा तयार करून नियोजन करावे. मनपा महिला बालकल्याणकडून १.४० कोटी, ५० लाख अपंग, १.२२ महागाई असे आता ३.१३ कोटी दिले जातात. मनपाची आर्थिक स्थिती पाहिली तर आगामी काळात देणे शक्य होणार नाही. त्यासाठी त्यांनी आतापासून नियोजन करावे.

पुरावा द्या, कारवाई करू
मनपापोटनिवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेसोबत असलेले पुरावे मिळाले तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी पक्षाकडे मागणी करेन. दोन जागांवर पराभव झाल्याने शहराध्यक्षांचा राजीनामा मागणे चुकीचे आहे, असे अॅड. बेरिया म्हणाले.

बेरियांचे बरोबर...
अॅड.बेरिया हे बरोबर बोलले. आम्ही सत्तेत असलो तरी प्रशासकीय कामकाज प्रशासनास करावे लागते. अडचणी असतील तर आम्ही सोडवतो. परिवहन फायद्यात आले पाहिजे, असे आमचे मत आहे. संजय हेमगड्डी, मनपा सभागृह नेता

नियोजन सुरू आहे
वाहक चालक आता घेतले आहेत. त्यामुळे बसच्या फेऱ्या वाढतील. फोरम आणि वाहतूक निरीक्षकांची बैठक घेतली. एकदम मार्ग वाढवले तर ते तोट्यात जातात. हळूहळू फायद्यात आणून वाढवणे आवश्यक आहे. त्यानुसार पुढील दीड महिन्यांत १० लाखांपर्यंत उत्पन्न जाईल. प्रदीप खोबरे, परिवहन व्यवस्थापक
बातम्या आणखी आहेत...