आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Russian And Chinese Language Started At Solapur University

सोलापूर विद्यापीठात रशियन आणि चिनी भाषा अभ्यासक्रम फेब्रुवारीपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर विद्यापीठ जनविकास केंद्रांतर्गत सामाजिक शास्त्र संकुलात येत्या फेब्रुवारीपासून रशियन चिनी भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला प्रारंभ होईल, अशी माहिती समन्वयक प्रा. प्रभाकर कोळेकर यांनी दिली.
तीन महिने कालावधीचा हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. यासाठी ३१ जानेवारीपर्यंत प्रवेश घेता येईल. दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. १३५० रुपये प्रशिक्षण शुल्क १७५ रुपये परीक्षा शुल्क आहे. चिनी भाषेसाठीची तासिका ही सोमवार ते बुधवार दुपारी चार ते पाच या वेळेत होईल. निवृत्त पोलीस उपधीक्षक रमेश मोहिते अध्यापन करतील.
रशियन भाषेसाठीच्या तासिका गुरुवार ते शनिवार दुपारी चार ते पाच या वेळेत होतील. मनीषा गुमते या अध्यापन करतील.