आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभापतीची २१ एप्रिलला निवड, सोलापूर बाजार समितीची विशेष बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर बाजार समितीच्या सभापती निवडीसाठी २१ एप्रिल रोजी विशेष सभा बोलावण्यात आली आहे. ही सभा समिती सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे.
राजशेखर शिवदारे यांनी अविश्वास ठराव मंजूर होण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने संचालकांची बैठक औपचारिकातच उरली होती, त्याप्रमाणेच आता संचालक नवीन सभापती कोणास निवडणार? हेसुद्धा फक्त औपचारिक राहिले आहे. माजी आमदार दिलीप माने यांचीच पुन्हा सभापतिपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे, माने यांनी नकार दिल्यास इतरांना संधी मिळू शकते, मात्र जर-तरची गोष्ट आहे.
अविश्वास ठराव आल्यानंतर शिवदारे यांनी राजीनामा दिला . त्याला मंजुरी िमळाल्यानंतर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी नवीन सभापती निवडीसाठी विशेष बैठक बोलावली आहे.

पुढील निवडणूक लक्ष्य
निवडणुकीतपॅनल तयार करण्यापासून ते सभापती निवडीपर्यंत आणि पुन्हा राजीनामा दिल्यापासून ते पुन्हा शिवदारे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करेपर्यंत माजी आमदार दिलीप माने यांची भूमिका प्रमुख राहिली आहे. यामुळे नवीन सभापती निवडताना आता पुढील पाच वर्षे डोळ्यासमोर ठेऊनच निवड केली जाईल. मात्र यामध्ये पुन्हा सभापती स्वत:कडे ठेवतील की नवीन संचालकास संधी देतील? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.