आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Karat And Shatrughan Dhotre, Paintings Publication In Jehangir Art Gallery

युवाचित्रकार सचिन खरात आणि शत्रुघ्न धोत्रे यांच्या चित्रांचे मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - युवाचित्रकार सचिन खरात आणि शत्रुघ्न धोत्रे यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील प्रसिद्ध जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये १७ ते २४ नोव्हेंबर २०१४ दरम्यान भरत आहे. विशेष म्हणजे शत्रुघ्नचे हे पहिलेच प्रदर्शन आहे.जिल्ह्यातून अनेक युवा कलावंत पुढे येत आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विविध पुरस्कार पटकावून त्यांनी जिल्ह्याची मान उंचावली आहे. खरातच्या चित्रांचे यापूर्वी सोलापुरात प्रदर्शन भरविण्यात आले होते.विविध संस्थांचे पुरस्कारही त्याला मिळाले आहेत. राज्यातील काही उद्योगपती, काही वृत्तपत्र समूहांनी त्याची चित्रे संग्रहात ठेवली आहेत. कॅन्व्हाॅसवर साकारलेली जवळपास १६ चित्रे जहाँगीरच्या प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत. चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी या प्रदर्शनासाठी सहकार्य केल्याचे खरात आणि धोत्रे यांनी सांिगतले.

सचनिच्या चित्रांना डॉ. आ.ह. साळुंखे यांची प्रस्तावना
शत्रुघ्न धोत्रेने (वय २३) चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. मात्र, बंधू प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे याच्याकडून त्याने प्रेरणा घेतली. ‘स्त्री सौंदर्य’ हा त्याच्या चित्रांचा विषय आहे. कॅन्व्हाॅसवर रेखाटलेली सेमी रियालिस्टिक प्रकारातील त्याची चित्रे भुरळ घालतात. त्याने स्वत:ची एक वेगळी शैली जोपासली आहे. त्याचे हे पहिलेचे प्रदर्शन आहे. जहाँगीर आर्ट गॅलरीत देशातील नामवंत चित्रकारांचे प्रदर्शन नेहमीच आयोजित केले जाते. गॅलरीचे विशेष संचालक मंडळ कलावंतांची निवड करून त्यांना प्रदर्शनाची संधी देत असते. वयाच्या २३ वर्षी जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरविण्याचा मान शत्रुघ्न धोत्रे याने पटकाविला आहे. शत्रुघ्नची एकूण चित्रे या प्रदर्शनात असतील.
‘इतिहासकाळातील स्त्रीचे सौदर्य, ितचे जगणे’ हा सचनि खरातच्या चित्रांचा विषय आहे. ख्यातनाम संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी यांनी या प्रदर्शनासाठी एक विशेष प्रस्तावना लििहली आहे. यात त्यांनी चित्रांची वैशिष्ट्ये, त्यातील ठळक गोष्टी, बारकावे आदींचे वर्णनही केले आहे. ही प्रस्तावना प्रदर्शनस्थळी लावण्यात येणार असल्याचे खरातने सांगितले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सचिन आणि शत्रुघ्‍न यांनी काढलेल्‍या पेटिंग्‍ज...