आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरचा युवा चित्रकार खरातला चित्रकलेचा बेस्ट इंडियन स्टाइल पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तथागत गौतम बुध्दांचे अंतरंग उलगडणाऱ्या युवा चित्रकार सचिन खरात (सोलापूर) याच्या ‘सरणं’ चित्राला आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने ‘बेस्ट इंडियन स्टाइल’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत मंगळवारी दुपारी प्रसिद्ध हॉटेल उद्योजक विठ्ठल कामत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने दरवर्षी देशभरातील चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकारांच्या विशेष कलाकृतींचा विविध १३ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. पुरस्काराचे यंदा ९७ वे वर्ष आहे. यंदा देशभरातून सुमारे हजार कलाकृतींचा समावेश होता.

मंगळवारी दुपारी विठ्ठल कामत यांच्या हस्ते सोलापूरचा युवा चित्रकार सचिन खरात याने हा पुरस्कार स्वीकारला. रोख पाच हजार रुपये, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कलाकृतींचे प्रदर्शन
पुरस्कारविजेत्या आणि समितीने निवडलेल्या कलाकृतींचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन होते. मंगळवार, २० जानेवारीपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. ते २६ जानेवारीपर्यंत असेल.