आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर - तेंडुलकरसह जावडेकर, धूत यांनी दिला सोलापूरसाठी लाखोंचा निधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्थानिक आमदार खासदारांकडून जिल्ह्यातील विकासकामांना निधी मिळतोच मात्र राज्यसभा खासदारांकडूनही सोलापूर जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. निधी देणाऱ्यांमध्ये देशातील बड्या हस्तींचा समावेश आहे. क्रिकेटचा देव अर्थातच खासदार सचिन तेंडुलकर, उद्योजक राजकुमार धूत, विद्यमान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार रामदास आठवले, काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन हलवाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण, काँग्रेसचे डॉ. जनार्दन वाघमारे या खासदारांनी जिल्ह्यातील विकासकामांना कोटी ५५ लाख रुपयांचा निधी दिला आहे.
स्थानिक आमदार, खासदार यांच्याकडून निधी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असते. काही हुशार कार्यकर्त्यांनी राज्यसभा खासदारांकडून निधी मिळवला आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सर्वच पक्षाच्या खासदारांकडून निधी मिळवला आहे. मागील वर्षातील सर्व कामे पूर्ण झाली आहेत तर चालू वर्षातील कामांना मंजुरी दिली असल्याचे नियोजन कार्यालयाकडून सांगण्यात आले.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कोणी किती दिला निधी