आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadabhau Khot News In Marathi, Madha Lok Sabha Constituncy, R.R.Patil

वादग्रस्त ऑडिओ क्लिपप्रकरणी आर. आर. पाटलांविरुद्ध गुन्हा दाखल करणार- सदाभाऊ खोत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंजर्‍यतील पोपट आहेत. माझ्याविषयीच्या ऑडिओ क्लिपवर भाष्य करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळायला हवी होती. या प्रकरणी लवकरच त्यांच्याविरोधात पोलिसांत फिर्याद देण्यात येईल, असे माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी येथे सांगितले.


गुरुवारी लोकसभेसाठी होणार्‍या मतदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. खोत म्हणाले, गृहमंत्री पाटील हे जनतेची सेवा करण्याऐवजी शरद पवार आणि कंपनीची सेवा करण्यात व्यस्त असतात. त्यामुळे एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने खात्री न करता जाहीर सभांमधून माझ्यावर टीकेची झोड उठवून एकप्रकारे गृहमंत्रिपदाची उंची कमी केली.


प्रत्येक पैशाचा हिशेब देण्याची तयारी : धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा या लढाईत केवळ सदाभाऊ खोत नव्हे तर तळागाळातील शेतकरी निवडणूक लढवत आहे. ‘एक नोट, एक व्होट’ या घोषणेला कर्नाटकाच्या सीमेपासून ते गडचिरोलीपर्यंतच्या शेतकर्‍यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर मदत दिलेल्या प्रत्येक शेतकर्‍याला त्यांच्या पैशाचा हिशेब देणार असल्याचेही खोत यांनी म्हटले.