आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन म्हणजे काही पवित्र गायींचा गोठा नव्हे! - संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राजकारणीसर्वच क्षेत्रांत असतात. ते साहित्य संमेलनात का नसावेत? अन् बिल्डर्स हे काय वाईट आहेत का? ते वैध मार्गानेच काम करतात. त्यामुळे संमेलनासाठी त्यांची मदत घेतल्याबद्दलची टीका होणे ही प्रवृत्ती चुकीची आहे. साहित्य संमेलन हे काय पवित्र गायींचा गोठा नव्हे? अशा शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाचे प्रस्तावित अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी राजकारणी आणि बिल्डर्स याची पाठराखण केली. साहित्यिकांनी लाचार होऊ नये, लाचार व्हायचे का? हा ज्यांचा-त्यांचा प्रश्न आहे, असेही सांगण्यास ते विसरले नाहीत.
डॉ. मोरे एका कार्यक्रमानिमित्त बुधवारी येथे आले होते. तत्पूर्वी त्यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी बातचीत केली. संमेलनाच्या आयोजनात बिल्डर्स लॉबी आणि राजकीय नेत्यांचा वावर याविषयी पत्रकारांनी विचारले असता ही प्रतिक्रिया डॉ. मोरे यांनी िदली. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनोरमा परिवाराचे श्रीकांत मोरे, मसापचे पद्माकर कुलकर्णी उपस्थित होते.
भालचंद्र नेमाडे यांनी मांडलेल्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले असता डॉ. मोरे म्हणाले, “इंग्रजी भाषेला आपणच निमंत्रण देतो. शब्द हे काही अपोआप तयार होत नाहीत. इंग्रजीला मराठीत शिरकाव हा आपलाच दोष आहे. आपणच आपली मुले इंग्रजीच्या शाळेत पाठवितो. साहित्यिकही त्याला अपवाद नाहीत. भाषा ही सर्वांची जबाबदारी आहे. जर संगणक भारतात तयार झाला असता तर तो संगणक म्हणून जगातही ओळखला गेला असता. तो परदेशातून कॉम्प्युटर या नावाने तयार होऊन आला म्हणून कॉम्प्युटर हा शब्द मराठीतही रुळला.”