आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sadashiv Khot News In Marathi, R.R.Patil, Nationalist Congress

आर. आर. राष्ट्रवादीतील प्रामाणिक गुंड, सदाशिव खोत यांचा हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महायुती ही फसव्यांची टोळी आहे म्हणणारे आर. आर. पाटील हे राष्ट्रवादीतील प्रामाणिक गुंड आहेत, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सदाभाऊ खोत यांनी लगावला.
सोलापूर र्शमिक पत्रकार संघात झालेल्या वार्तालापप्रसंगी खोत म्हणाले, ‘माढा मतदारसंघाचा 40 टक्के भाग बागायती तर 60 टक्के भाग दुष्काळी आहे. टेंभू, सीना-माढा, उजनीच्या पाण्याचे समान वाटप, सहकार चळवळ वाचवणे आदी विषयांवर प्रचार करणार आहोत. करकंब येथे झालेल्या सभेत आर. आर. पाटील यांनी महायुतीवर टीका केली होती. हा धागा पकडून खोत म्हणाले, पाटील यांनी तासगावचा हुतात्मा कारखाना 14 कोटीला विकला. राष्ट्रवादी गुंडाची टोळी आहे. लोकांना शिवराळ भाषा वापरून ते त्यांचा अपमान करतात, हे चालते का? असेही खोत म्हणाले.


माझी नार्को टेस्ट करा
धुळे येथील दूध डेअरीमध्ये मी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही. मी स्वत:हून चौकशीला सामोरे गेलो आहे. हवी तर माझी नार्को टेस्ट करा. आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणात येणार नाही, असे खोत म्हणाले.


सदाभाऊ म्हणाले,
> पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी आग्रह करणार
> सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्यासाठी आंदोलन
> गावगाड्यातील जनतेवर विश्वास, तिच्या बळावरच निवडून येणार
> सहकार चळवळ वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार