आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य गौरव:शरद प्रतिष्ठानचे पुरस्कार झाले जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शरद प्रतिष्ठानचा शरद पुरस्कार जाहीर झाला. ख्यातनाम समीक्षक प्रा. निशिकांत ठकार, साहित्यिक डॉ. अजिज नदाफ, कवी डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली व कन्नड भाषांतरकार स्वरूपा बिराजदार मानकरी ठरले आहेत. प्रतिष्ठानचे निमंत्रक महेश गादेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. छत्रपती रगंभवन सभागृहात शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी सहाला मान्यवरांना गौरवण्यात येणार आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते वितरण होणार आहे. आंतरभारती अनुवाद केंद्राच्या संचालिका प्रा. पुष्पा भावे अध्यक्षस्थानी असतील. या वेळी उपमहापौर हारूण सय्यद, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, प्रदीप गारटकर यांची उपस्थिती असेल, असेही त्यांनी सांगितले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश शिंदे, उपाध्यक्ष अनिल पानसे, कोषाध्यक्ष राम साठे, सचिव बिपीन कुलकर्णी, सहसचिव लता फुटाणे, भारत जाधव, धनंजय पाटील आदी उपस्थित होते.
मराठी, हिंदी, उर्दू, तेलुगु, कन्नडच्या सेवेचा गौरव
ठकार यांना हिंदी, मराठी अनुवादातील सेवेबद्दल, नदाफ यांना शिक्षण व उर्दू, हिंदी व मराठी साहित्य सेवेसाठी, डॉ. बोल्ली यांना तेलुगु, मराठी साहित्य सेवेसाठी तर बिराजदार यांना कन्नड, मराठी सेवेसाठी सन्मानित करण्यात येत आहे. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व र्शीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचे गादेकर म्हणाले. बहुभाषक सोलापूरचे हे भूषण असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार होत असल्याचे त्यांनी सांगितले.