आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sahityatuna Be Expressed Environment Atul Deulagavakara

साहित्यातून व्यक्त व्हावे पर्यावरण-अतुल देऊळगावकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-पर्यावरण हे स्थानिक नसून ते वैश्विक आहे. जागतिक स्तरावर आपल्या भोवतालच्या पर्यावरणावर अभ्यासपूर्ण मत, समस्या, उपाययोजना मांडल्या जातात. मात्र, भारतात आपल्या भोवतालच्या पर्यावरणाबद्दल फारसे बोलले अथवा लिहिले जात नाही. आपल्या साहित्यातून आपल्या भोवतालच्या पर्यावरणाबद्दल लिहिलं जावं. ते आपल्या साहित्यातून व्यक्त झाले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी मांडली.
डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहातील ग्रंथोत्सव कार्यक्रमातील परिसंवादात ते बोलत होते. पर्यावरण वैश्विक भान हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. ते म्हणाले, ‘‘आपत्ती आल्यानंतर आपण सर्वजण जागे होतो. आपत्ती येण्यापूर्वी आपण गप्प असतो. ही परिस्थिती बदलली पाहिजे. पर्यावरण हे नेहमीच वैश्विक आहे. जग एकत्र असताना पर्यावरणाचा स्वत:पुरता विचार करता येणार नाही. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. भारतात 65 टक्के क्षेत्र जैवविविधतेने नटलेले आहे. त्यातील 25 टक्के प्रमाणात प्राणी, पक्षी, वनस्पती नष्ट झालेल्या आहेत. याचा सर्वानीच गंभीरतेने विचार व्हावा. ’’