आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saiffan Bagwan In Hurdle Jump Competition Solapur

सैफन करणार हर्डल्स जंपचा विक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पुणे-सोलापूर विनाथांबा स्केटिंग करून लिमका बुकमध्ये नाव नोंदवणार्‍या सैफन बागवानने आणखी एक विक्रम करण्याचा निर्णय घेतला. ‘हर्डल्स जंप’ म्हणजे अडथळ्यांवरून तो उडी मारत स्केटिंग करणार आहे. सुमारे चार तास चालणार्‍या या स्केटिंगमध्ये हजारहून अधिक उड्या मारणार असल्याचे त्याने सांगितले. 30 डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजता त्याच्या या नव्या विक्रमास सुरुवात होईल.

बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या सैफनने यापूर्वी पुणे ते सोलापूर 307 किलोमीटरचे अंतर 17 तास 39 मिनिटांत पूर्ण केले. कुठेही न थांबता त्याने हा विक्रम करून लिमका बुकमध्ये नाव नोंदवले होते. त्याच्या पुढचा टप्पा म्हणून त्याने नव्या विक्रमाची मोठी तयारी केली. जुना पुणे नाका येथील अरविंद धाममागील रस्त्यावर अडथळे ठेवून ते पार करण्याचा त्याचा मानस आहे. क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहून प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्याने केले.

मदतीचे आवाहन
रस्त्यावर अडथळे निर्माण करण्यासाठी लोखंडी अँगल घालण्यात येणार आहेत. दीड किलोमीटर रस्त्यावर असे अनेक अडथळे घालण्यासाठी किमान 30 हजार रुपयांचा खर्च होईल. तेवढे पैसे सैपनकडे नाहीत. त्यासाठी तो क्रीडाप्रेमींकडून वर्गणी गोळा करतोय. दानशूर व्यक्तींनी पुढे आल्यास त्याच्या विक्रमाला हातभार लागेल. त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी 9623676333 क्रमांकावर संपर्क साधावा.

कोण आहे सैफन?
सैफन बागवान हा मुरारजी पेठेतल्या मनोहरनगर झोपडपट्टीत राहणारा 20 वर्षीय तरुण. स्केटिंग हा त्याचा आवडता खेळ. वडील जब्बार बागवान रिक्षाचालक आहेत. आई घरकाम करते. धाकटा भाऊ शिक्षण घेतो. घरची स्थिती अशी बेताची असतानाही त्याने स्केटिंमध्ये रूची ठेवली. लिमका बुकमध्ये विक्रम नोंदवला. आता अडथळ्यांच्या शर्यतीप्रमाणे स्केटिंग करत तो अडथळे पार करणार आहे.