आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salagara Budruka Of Sarpanch Suicide By Consuming Poison

सलगर बुद्रूकच्या सरपंचाची विष प्राशन करून आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा- सलगर बुद्रूकचे सरपंच निलाप्पा बाबूराव बिराजदार (वय ५०) यांनी राहत्या घरी बँकेच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. सतत तीन वर्षे डाळिंब आणि द्राक्ष पीक वाया गेल्याने त्यांनी विष प्राशन केले होते. चंद्रकांत पाटील यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्याला घटनेची माहिती दिली.
बिराजदार यांनी गावातीलच वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेकडून द्राक्ष आणि डाळिंब पिकासाठी कर्ज घेतले होते. दुष्काळी परिस्थितीमुळे सलग तीन वर्षे शेतीतून उत्पन्न निघत नसल्याने शेती तोट्यात आली होती. बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा भार वाढत होता. मृत बिराजदार यांनी रविवारी सकाळी १० वाजण्यापूर्वी द्राक्ष बागेवर फवारणीसाठी आणलेले विषारी औषध प्राशन केले. त्यांना सलगरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आमदार भारत भालके यांनी बिराजदार कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. बिराजदार यांच्या मागे आई, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.