आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालार्थमध्ये अडकले शिक्षकांचे वेतन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-राज्यातल्या सर्वच शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे देण्यात येणार आह़े यासाठी शिक्षकांनी या प्रणालीमध्ये आपली माहिती भरणे आवश्यक आहे; मात्र सर्व्हरवर ताण आल्याने हजारो शिक्षकांना अद्याप ही माहिती भरता आलेली नाही़ त्यामुळे जानेवारी महिन्याचे वेतन शिक्षकांना वेळेत मिळणार वा नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह़े त्यामुळे सोलापूर शहर व जिल्हय़ातील एकूण 2737 शिक्षकांचे पगार वेळेत होण्याची शक्यता कमी झाली आहे.
शालार्थमध्ये माहिती भरण्याची अखेरची मुदत 23 जानेवारी होती; पण अनेक जिल्ह्यांतल्या शाळांना ही माहिती भरता आलेली नाही़ शालार्थ डॉट महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळावर लॉग इन करायला गेल्यास ‘सिक्युरिटी एरर’ येतो़ एरर घालवण्यास अर्धा ते पाऊ ण तासाचा कालावधी लागतो़ त्यानंतर माहिती भरल्यास ती भरून घेतली जाते आणि सेव्ह करण्याच्या वेळी मात्र सेव्हच होत नाही़ या प्रकारामुळे अनेक शिक्षकांना माहिती भरता आलेली नाही़ जानेवारी 2014 चे अन्य सर्व जिल्ह्यांतले शिक्षकांचे वेतन या प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. ऑफलाइन तरी वेतन द्या
शिक्षण विभागाने जानेवारी 2014 चे वेतन शालार्थ या ऑनलाइन प्रणालीद्वारे देण्यात येणार होते. मात्र अद्याप शालार्थची माहिती भरून न झाल्याने जानेवारीचा पगार वेळेत मिळण्याची शक्यता नाही. शिक्षकांचे वेतन ऑनलाइन होत नसल्याने ऑफलाइन म्हणजे पूर्वीप्रमाणे मिळावे, असे निवेदन शिक्षण संचालकांना पाठवून देण्यात आले आहेत.’’ सुनील चव्हाण, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षण संघटना
शालार्थ प्रणालीद्वारेच काढण्याचे आदेश
शाळांनी संपूर्ण माहिती शालार्थद्वारे भरावयाची आहे. या वर्षीपासून वेतन हे शालार्थवेतन प्रणालीद्वारे काढण्याचे आदेश आहेत. त्यामुळे संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच वेतन मिळेल. बहुतेक जानेवारी व फे ब्रुवारीचा पगार एकत्रही देण्यात येईल.’’ प्रकाश मिर्शा, अधीक्षक, वेतन पथक