आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Saleem Khan Academy Won Five Cricket Matches In Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सलीम'ने मुंबईतील पाचही सामने जिंकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सलीम खान अकादमीने मुंबई दौऱ्यातील पाचही सामने जिंकले. या पाचही सामन्यांमध्ये मानसी जाधव, मल्हार गायकवाड, सलमान पठाण, पूर्वल गायकवाड, शुभम सोनार, ओंकार कोटा अजरूद्दीन शेख यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांचा अकादमीच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा सत्कार राजा देशमुख, फिरोज आलमेलकर, चंद्रकांत रेम्बर्सु के. टी. पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यात सर्वोत्तम कामगिरी मानसीने केली. मानसीने पाच सामन्यातून २११ धावा केल्या. यात सर्वाधिक नाबाद ४१ धावांची खेळी केली.
अन्य खेळाडूंची कामगिरी
मल्हार गायकवाड (१९२ धावा, सर्वाधिक ५१, सलमान पठाण (२११, सर्वाधिक ७१), पूर्वल गायकवाड (१७६, सर्वाधिक ६१), शुभम सोनार (१६१, सर्वाधिक ५७), अोंकार कोटा (२१ बळी, सर्वोत्तम ३-२७), अझरूद्दीन शेख (१५ बळी, ४-३६).

मुंबई दौऱ्यातील पाचही सामने जिंकून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सलीम खान अकादमीच्या संघातील खेळाडूंसमवेत प्रमुख पाहुणे राजा देशमुख, फिरोज आलमेलकर, चंद्रकांत रेम्बर्सु, के. टी. पवार.