आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीकर निरीक्षक पदाची पूर्वपरीक्षा रविवारी होणार, शहरात २७ केंद्रांवर व्यवस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील२७ केंद्रांवर फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते या वेळेत विक्रीकर निरीक्षक पदासाठी पूर्वपरीक्षा होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही परीक्षा घेत आहे. येथून तब्बल नऊ हजार ८४० उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. त्यांची बैठक व्यवस्था शहरातील काही प्रमुख शाळांमध्ये करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख परीक्षा नियंत्रकाचे काम पाहतील. परीक्षेच्या व्यवस्थेसाठी जिल्हा प्रशासनातील ७१५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये समन्वयक अधिकारी ५, उपकेंद्र प्रमुख ३०, पर्यवेक्षक १५४, समवेक्षक ४६४, लिपिक ३० शिपाई ३२ अशा कर्मचाऱ्यांचा ताफा नियुक्त केला आहे. परीक्षा सुरळीत होण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था आणि बंदोबस्त याचे नियोजन झाले असल्याचे प्रशासनाने सांगितले.