आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटचा देव सचिनला तरुणाईचा सलाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - फेसबुक आणि विविध सोशल नेटवर्कच्या साइट आज क्षणाक्षणाला अपडेट होत होत्या. सलग पाच दिवस व कदाचित त्यानंतरही सचिनच्या नावाचा जयघोष सुरूच राहील, असाच माहोल दिसून येत आहे.

सारे नेटिझन्स सचिन आणि सचिन या एकाच शब्दाभोवती फिरत होते. हा क्रिकेटचा देव क्षितिजाकडे निघाल्याची सल मनात तर आहेच पण सचिनचे अंतिम कसोटीतील क्षण आणि क्षण डोळ्यात प्राण आणून पाहात आहेत. मनातल्या भावना फेसबुकच्या माध्यमातून इतरांशी शेअर करताहेत. सारे नेटिझन्स सचिनमय झाल्याचेच दिसून येत आहे.

विश्वास स्वामी फेसबुकवरील आपल्या वॉलवर लिहितात. वर्ल्डस बिगेस्ट सिक्युरिटी कव्हर इन स्पोर्ट्स फॉर सचिन. वानखेडे स्टेडियमवर सचिनसाठी 3 डेप्युटी कमिशनर, 18 असि. कमिशनर, 35 पोलिस इन्स्पेक्टर, 90 सब इन्स्पेक्टर, 850 पोलिसमन, 200 लेडी पोलिस, बॉम्बशोधक सहा पथके, 16 मार्क्‍समॅन व्हेईकल, एसआपीएफची सहा कंपनी, 352 सीसीटीव्ही कॅमेरे. सुरक्षेसाठी तैनात. स्टेडियमच्या छतावरून करडी नजर. संपूर्ण दक्षिण मुंबई पाच दिवसांसाठी नो फ्लाय घोषित. ज्ञानेश्वर अर्दड यांनी राजाभाऊ मोगल यांची कमेंट शेअर केली. सचिनला देव म्हणणे एकवेळ समजू शकतो. असे या दोघांनी म्हटले आहे. ऋषिकेश अकतनाळ यांनी मात्र राजकीय कमेंट केली आहे.

कसोटीतील प्रत्येक गोष्टीची होतेय नोंद
राजेंद्र खराडे म्हणतात, जर जिवंतपणी देव पाहायचा असेल तर वानखेडे स्टेडियमवर या...

फूल टू धमाल पेजने रसिकांच्या या सचिनप्रेमावर जरा तिरकस संधान साधले. त्यामुळे सचिनवर का जळता आहात अशा टीकांचाही सामना लेखकांना करावा लागला.

लक्ष्मीकांत गुंड म्हणतात, पंच मॅथ्थ्यू हेडन म्हणाले आहेत की, मी आज देव पाहिलाय . तो भारतासाठी चौथ्या क्रमांकाची बॅटिंग करतोय..

नागनाथ पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून वानखेडेच्या ग्राऊंड स्टाफने सचिनचा खास सत्कार केल्याचे सांगून अधिकची माहिती दिली.

अभी रामपुरे यांनी भावुक होऊन नोंदवत स्व. बाळासाहेब ठाकरे यांचेही त्यांनी स्मरण केले.

संतोष हलकुडे म्हणतात, सचिनला ओपनिंगला पाठवायला हवे होते..