आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्व दाखले एकाच छताखाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शासकीय कार्यालयाअंतर्गत येणारे सर्व दाखले एकाच छताखाली मिळावे म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांनी शनिवारी दत्त चौकातील सरस्वती विद्या मंदिर येथे समाधान शिबिर घेतले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विविध दाखल्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या.

सोलापूर शहर उत्तर मतदार संघातील नागरिकांना सेतू कार्यालय, महापालिका आणि शासकीय रुग्णालयात मिळणार्‍या दाखल्यासाठी नागरिकांना घालावे लागणारे हेलपाटे आणि त्यांचा वेळ वाचावा म्हणून आमदार देशमुख यांनी हे समाधान शिबिर घेतले. या वेळी आमदार देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर, भाजपचे प्रकाश मारता, प्रा. अशोक निंबर्गी, बिज्जू प्रधाने, अशोक खटके, देविदास चळेकर, तनुजा कुलकर्णी उपस्थित होते.

नागरिकांची गर्दी - शासकीय दाखल्यासाठी आवश्यक असलेले फॉर्म घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने रांगा लागल्या होत्या. फॉर्म भरल्यानंतर ते देण्यास 20 शिक्षकांची नियुक्ती केली होती. त्यामुळे फॉर्म अचूक भरण्यात येत होते.

या दाखल्यासाठी आले अर्ज - जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमेलेअर, रहिवाशी दाखला, वयाचा दाखला, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, दुबार शिधापत्रिका, शिधापत्रिकेत नाव लावणे व कमी करणे, नवीन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा, अपंग, र्शावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब योजना, जन्म/मृत्यू दाखले.

भाजपची स्वतंत्र यंत्रणा - दाखले घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना अडचण येऊ नये म्हणून त्यांना मार्गदर्शन करणे, नागरिकांना दाखले वेळेत मिळावेत यासाठी झेरॉक्स मशीन, पिण्याच्या पाण्याची सोय आदी सोयी भाजपने स्वतंत्र यंत्रणा लावून केल्या होत्या. नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व नगरसेवक या वेळी उपस्थित होते.
नागरिकांचा प्रतिसाद - नागरिकांना एकाच छताखाली दाखले देता यावेत म्हणून समाधान शिबिर घेण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि विशेषत: महिलांना यांचा लाभ घेता आला. शासकीय कार्यालयात नागरिकांना घालावे लागणारे हेलपाटे वाचावे, त्यांचा त्रास कमी व्हावा हाच या शिबिरामागचा उद्देश होता.’ विजयकुमार देशमुख, आमदार