आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२४ तास दाखवायचे काय हा चॅनलला पडलेला प्रश्न - डॉ. समीरन वाळवेकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भारतामध्ये आजमितीला जवळपास ६४८ चॅनल तयार झाले आहेत. यातील दूरदर्शनचे सरकारी ३० चॅनल सोडले तर सगळेच खासगी चॅनल आहेत. चॅनलच्या या दुनियेत प्रत्येक चॅनलवर वेगळे काही तरी दाखविण्याचा खटाटोप केला जातो.
वेगळे काही तरी दाखविण्याच्या नादात चॅनल्सनी कौटुंबीक उंबरे ओलांडून बेडरुमपासुन ते किचनपर्यंतच्या बाबी टीव्हीवरून प्रसारित होऊ लागल्या आहेत. न्यूज चॅनलच्या बाबतीत काही अंशी हेच घडत आहे. कारण अशा चॅनल्ससमोर पुढचे २४ तास काय दाखवायचे हा प्रश्न समोर उभा राहतो. यामुळे घरगुती भांडण बातम्या म्हणून दाखविले जात असल्याचे ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. समीरन वाळवेकर यांनी सांगितले.

दि लक्ष्मी को ऑप. बँक लि., सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने ते जानेवारी दरम्यान हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृह येथे नववर्ष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. शनिवारी सायंकाळी वाळवेकर यांनी तिसरे पुष्प गुंफताना जनमत घडविण्यात प्रसार माध्यमांची भूमिका या विषयावर विचार मांडले.

‘माध्यमाविषयी भूमिका मांडताना त्यांनी माध्यमात होत असलेल्या बदलांचा ऊहापोह केला. माध्यमे आता व्यावसायिक प्रोडक्ट बनत असल्याचे सांगताना त्यांनी वर्तमानपत्रात चॅनल्सवर जाहिरातीचे महत्त्व पटवून सांगितले. वर्तमानपत्रात जाहिरात नसेल तर वर्तमानपत्र हे १०० ते १२५ रुपयांपर्यंत जाईल.
हीच स्थिती चॅनल्सच्या बाबतीत आहे. कोणतेही मराठी चॅनल सुरू करण्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा खर्च होतो. तर ते चालविण्याचा महिन्याकाठचा खर्च ते कोटी रुपयांचा असतो. कोणतेही चॅनल अथवा वर्तमानपत्र केवळ सद्भावनेवर चालत नाही तर त्यासाठी जाहिरातही लागते.’

उद्योजकांचा शिरकाव वाढला
प्रसारमाध्यमांची ताकद राजकारण्यांनी उद्योजकांनी ओळखली असल्याने आता प्रसारमाध्यमात राजकारणी बरोबर उद्योजकांनीदेखील उडी घेतली आहे. एक दबाव तयार करण्यासाठी ते त्याचा वापर करतात. कारण माध्यमांमध्ये सत्ता उलथवून टाकण्याची ताकद आहे. परंतु, माध्यमे हे जनतेच्या हितासाठी तयार झाली पाहिजे. तरच लोकांचा माध्यमांवरचा विश्वास कायम राहील.