आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच ऑनलाइन वाळू लिलाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - रखडलेल्या वाळू लिलावाला मुहूर्त मिळाला. त्याची प्रक्रिया 16 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ती पहिल्यांदाच ऑनलाइन करण्याचा प्रयत्न महसूल प्रशासनाचा आहे. विशेष म्हणजे यात राज्य सरकारसह प्रशासनाच्या नव्या नियमांचे पालन ठेकेदारांना करावे लागणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी लक्ष घातले आहे. वाळूची चोरी व अवैध उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने यंदा कंबर कसली आहे. त्यानुसार वाळू उपसा व वाहतुकीची नियमावली तयार केली आहे. यामध्ये पावतीचे स्कॅनिंग, तपासणी नाके, वाळूची वाहतूक करणार्‍या वाहनास बारकोड, वाळू स्थळावर सीसीटीव्ही कॅमेरे आदीचा समावेश असेल. शिवाय एका वाळू स्थळाहून एका दिवसात किती वाळूचा उपसा करण्यात आला, याचा अहवालही तहसील कार्यालयास दिला जाईल.

142 साठय़ांचा लिलाव
68 ठिकाणच्या 142 स्थळांचा लिलाव करणार आहेत. 16 ते 28 नोव्हेंबर दरम्यान प्रक्रिया होईल. यासाठी महसूल यंत्रणेची तयारी पूर्ण आहे.

100 कोटींकडे ..
राज्य शासनाने वाळू लिलावातून 50 कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. 100 कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. उद्दिष्टही पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागत होती. मागील वर्षी 1 लाख 57 हजार 955 ब्रास वाळूचा लिलाव झाला. त्यातून 30 कोटी मिळाले.,

16 नोव्हेंबरपासून सुरू
जिल्ह्यातील 68 ठिकाणांवरील 142 स्थळांचा लिलाव 28 नोव्हेंबर रोजी करणार आहेत. राज्य शासनाने 50 कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले असले तरी त्यापेक्षा अधिक महसूल मिळवण्याचा प्रयत्न असेल. याविषयीची प्रक्रिया 16 नोव्हेंबरपासून सुरू होईल.’’ शंकरराव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी, महसूल