आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू वाहतुकीच्या ३० वाहनांवर ४७ लाखांची दंडात्मक कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा महसूल खाते पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी रात्री सिद्धापूर येथून भीमा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळू वाहतुकीच्या ३० ट्रकवर दंडात्मक कारवाई केली. ते ट्रक पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले होते. - Divya Marathi
मंगळवेढा महसूल खाते पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी रात्री सिद्धापूर येथून भीमा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळू वाहतुकीच्या ३० ट्रकवर दंडात्मक कारवाई केली. ते ट्रक पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले होते.
मंगळवेढा - पोलिस महसूल प्रशासनाने मंगळवारी (दि. १५) रात्री सिद्धापूर येथून भीमा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळू वाहतूक करणा-या ३० ट्रक पकडून महसूल प्रशासनाने ३५ लाखांचा तर उपप्रादेशिक परिवहन खात्याने १२ लाखांचा असा एकूण ४७ लाखाचा दंड केला.सिद्धापूर येथील वाळू ठिकाणाचा लिलाव झाला अाहे. मात्र विनापावती मर्यादेपेक्षा अधिक वाळूची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिका-यांकडे करण्यात आल्या होत्या.
पोलिस महसूल खात्याच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सांगली, कोल्हापूरकडे निघालेल्या वाळू वाहतुकीच्या ३० ट्रकची तपासणी केल्यानंतर चालकांकडे पावत्या नव्हत्या. काही ट्रकमध्ये ३० टनापर्यंत वाळू भरल्याचे आढळल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी सांगितले. ३० ट्रकचे वजन केल्यानंतर ५०० टन वाळू अधिक आढळल्याचे सहायक मोटार वाहन निरीक्षक राजू नांगरे अतुल नांदगावकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या गाड्यांना १२ लाखांचा दंड ठोठावला. तर तहसीलदार पुनाजी कोथेरे यांनी ३५ लाखांचा दंड केला. दरम्यान, वाळूच्या गाड्या ठाण्यात आणल्यानंतर वाळू वाहतुकीच्या पावत्या देण्यात आल्याची चर्चा होती. रात्री वाळू उपशाला बंदी आहे. तरीही रात्री वाळू उपसा होत असल्याचे या कारवाईने उघड झाले. बेकायदा वाळू उपसा हाेत असतानाही महसूल प्रशासनाचे याकडे लक्ष नाही.

रात्रभर सुरू होती कारवाई
मंगळवारीसांगोल्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे या मोहिमेत असताना आंधळगावनजीक एका ढाब्यावर ४० ते ५० गाड्या थांबल्या होत्या. तहसीलदार पाटील यांनी जिल्हाधिका-यांना हा विषय कळवला. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार विभागीय पोलिस अधिकारी किशोर कराडे, पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, तहसीलदार कोथेरे यांच्यासह कर्मचारी वाहने पकडून पोलिस ठाण्याच्या आवारात लावत होते. रात्रभर ही कारवाई सुरू होती.

विनापावती मर्यादेपेक्षा अधिक वाळू वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई केली आहे. यापुढेही कारवाईत सातत्य राखले जाईल. पुनाजी कोथेरे, तहसीलदार, मंगळवेढा