आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू ठेकेदारांनी भरला साडेचार कोटींचा विक्रीकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शासन आदेशानुसार वाळू ठेकेदारांकडून १० टक्के व्हॅट घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील वाळू ठेकेदारांकडून कोटी ५६ लाख २० हजार रुपयांचा विक्रीकर मिळाला आहे. १३ ठिकाणचे लिलाव झाले असून, यापैकी ठेकेदारांनाच प्रत्यक्षात ताबा देण्यात आला. मागील वर्षी १९ ठिकाणचे वाळू लिलाव गेले होते. यातून कोटी रुपयांचा विक्रीकर जमा झाला होता. चालू २०१४-१५ या वर्षात सात ठेकेदारांनी विक्रीकराची रक्कम प्रशासनाकडे जमा केली आहे. यामध्ये ठेकेदार अभिजित पाटील यांनी ९१ लाख ५० हजार, रघुनाथ नागणे यांनी ९५ लाख, सुरेखा काटगाव यांनी ५९ लाख ५० हजार, सरसाई इंडस्ट्रीज यांनी ९४ लाख, विनोद रोंगे यांनी १६ लाख २० हजार, गुड्डेवाडी येथील ठेकेदाराने ८० लाख तर निमगाव ह. येथील ठेकेदाराने २० लाख असे एकूण कोटी ५६ लाख २० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

लिलावा वेळीच ठेवली अट...
शासन आदेशानुसार वाळू ठिकाणचे लिलाव प्रक्रिया राबवतानाच १० टक्के व्हॅट भरण्याची अट ठेवण्यात आली. त्यानुसार मागील वर्षी कोटी तर चालू वर्षी साडेचार कोटींची रक्कम मिळाली आहे. ही रक्कम विक्रीकर कार्यालयाकडे जमा करण्यात आली आहे. - शंकरराव जाधव, महसूल उपजिल्हाधिकारी.