आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sand Excavation Tow Criminal Arrested In Solapur

पोलिसांच्या भीतीने दोघे अंधारात पळाले आणि 40 फूट कोरड्या विहिरीत पडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर - मंद्रूपहून वाळू भरून निघालेला ट्रक चालकाने समोरून पोलिस गाडी येत असल्याचे पाहून रस्त्याच्या खाली सोडला आणि अंधारात धूम ठोकली. धावता-धावता चालक आणि क्लीनर 40 फूट खोल कोरड्या विहिरीत कोसळले. सोबत पळालेला आणखी एकजण बाजूला जाऊन पडला. ही घटना मंद्रूप येथे गुरुवारी पहाटे घडली. ग्रामस्थांनी विहिरीत कोसळलेल्या दोघांना क्रेनच्या सहाय्योन बाहेर काढले.

सोलापुरातील खासगी रुग्णालयात दोघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विहिरीतून दोघांना बाहेर काढताना ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

पोलिसांच्या भीतीने पळालो
आमची वाळूची ट्रक जाताना समोरून मंद्रूप पोलिसांची गाडी येत होती. ट्रक पकडतील म्हणून चालक मणियार याने रस्त्याच्या खाली गाडी घेतली. ट्रक थांबवून आम्ही तिघेजण पळालो. तांबोळी व मणियार अंधारामुळे विहिरीत पडले तर मी विहिरीच्या वरती बांधाआड पडल्याने जखमी झालो. पांडुरंग काळे, जखमी तरुण

गस्तीवरच्या पोलिसांना भिऊन विहिरीत पडले
रात्रपाळी असल्याने फौजदार खाडे व चालक दराडे गस्त घालत होते. निंबर्गीकडे जाताना ट्रक चालकाने भिऊन ट्रक रस्त्याच्या खाली घेऊन पळून जात होते. त्यातच ही दुर्घटना घडली. ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना विहिरीतून काढले. विनोद घुगे, साहाय्यक पोलिस निरीक्षक, मंद्रूप

अन् पळापळ झाली
ट्रक (एम.एच.04 एच 6792) मध्ये वाळू भरून वरील तिघे सोलापूरच्या दिशेने निघाले होते. मंद्रूप गावातील पूजा धाब्याजवळच्या चौकात मंद्रूपचे फौजदार युवराज खाडे व चालक लक्ष्मण दराडे गस्तीवर होते
समोरून येणारे पोलिस पाहून मणियार यांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतला. ट्रकमधून उडी मारून तिघेही अंधारात पळाले. पुढे महादेव व्हनमाने यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत दोघे पडले तर काळे हा विहिरीच्या वरच्या बांधाखाली पडला.
जखमी अवस्थेत काळे यांनी तांबोळी व मणियार विहिरीत पडल्याचे ग्रामस्थांना सांगितले. जिल्हा परिषद सदस्य अप्पाराव कोरे व इतर ग्रामस्थांनी दोन्ही तरुणांना वाचविण्यासाठी हालचाल केली.

दोघांच्या कमरेचे हाड मोडले
विहिरीच्या पायर्‍या व्यवस्थित नसल्याने दोघांना वरती काढता येईना. अखेर क्रेन मागविण्यात आले. मंद्रूप ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका बोलाविली. क्रेनच्या दोरीला स्ट्रेचर बांधून दोघांना अलगद विहिरीतून बाहेर काढण्यात आले. 40 फूट खोल विहिरीत पडल्याने दोघांच्या कमरेचे हाड मोडल्याचे सांगण्यात आले. विहिरीच्या पायर्‍या नसल्याने दोघांना वरती काढता येईना.

जखमींचे नावे : दादासाहेब बाबूलाल मणियार (ट्रकचालक ) व दादासाहेब अब्दुल तांबोळी (क्लीनर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. पांडुरंग इरप्पा काळे हा विहिरीच्या बाजूस पडल्याने किरकोळ जखमी झाला.