आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेगाव दुमालात दुसऱ्या दिवशी कारवाई नाही, महसूल, पोलिस आरटीओचे पथक थंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरील छायाचित्र सादरणीकरणासाठी वापरण्यात आले आहे)
पंढरपूर- महसूल प्रशासन, आरटीओ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शेगाव दुमाला येथे मंगळवारी केलेली कारवाई म्हणजे चक्क डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखे आहे. सलग नऊ ते दहा तास ही कारवाई सुरू होती. केवळ कागदपत्रे नसल्याने फक्त १५ वाहनांवर कारवाई केली.
वाळूने भरलेले एकही वाहन या पथकाला मिळाले नाही, हे विशेष. आणखी दोन दिवस कारवाई करणार असल्याचे सांगणाऱ्या या पथकाने बुधवारी कोणतीची कारवाई केली नाही. तहसीलदारांनी १५ आरटीओने १७ वाहनांवर कारवाई केली. तसेच पोलिसांनी पकडलेल्या वाहनांविषयी काही माहिती मिळू शकली नाही.
तालुक्यातील भीमा नदीच्या काठावरील ३० गावांमधून दिवस-रात्र अवैध वाळू उपसा होत आहे. काही गावांत दगड खाण माफियांचाही सुळसुळाट आहे. नदीपात्राशेजारील मातीही चोरून नेली जात आहे. मात्र, त्याकडे महसूल, आरटीओ आणि पोलिस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे रूजू झाल्यानंतर वाळूमाफियांचे धाबे दणाणले होते. मात्र महसूल, आरटीओ पोलिसांमधील काही मुरलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांपुढे जिल्हाधिकारीही हतबल झाल्याचे दिसते. काही अधिकारी कर्मचाऱ्यांचे वाळूमाफियांशी लागेबांधे असल्यानेच वाळू चोरीला प्रोत्साहन मिळत आहे.
पोहरगाव येथे नुकतीच एकाची हत्या झाली. त्यापूर्वी शेळवे येथेही ठेकेदार तस्करांत हाणामारी झाली होती. यात ठेकेदारांची वाहने जाळण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी शेगाव दुमाला वाळू चोरीवेळी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. मध्यंतरी तहसीलदार गजानन गुरव यांनाही वाळूमाफियांनी दमबाजी केली होती. याकडे जिल्हा प्रशासन गांभीर्याने पहाताना िदसत नाही.
शेगाव दुमालामधील वाळू तस्कारांची एकी दिसते. तेथे १०० वाहने आहेत. या ट्रॅक्टर, ट्रॉली, जेसीबी डंपर, टिपरची आरटीओत नोंद आहे का याच्या तपासणीची आतापर्यंत तसदी घेतली गेली नाही. याप्रकरणी विभागीय आयुक्तांपर्यंतही तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतरही प्रशासन हलले नाही. परंतुु रविवारी शेगाव दुमालात झालेल्या अपघातानंतर महसूल, आरटीओ आणि पोलिसांनी मोहीम हाती घेतली. यात सहभागी तीनही खात्याच्या अधिकाऱ्यांनी िदलेल्या माहितीतील तफावतीमुळे या कारवाईविषयीही साशंकता आहे.

कारवाईत तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसह महसूल खात्याचे ३० ते ४०, आरटीओचे दोन अधिकारी १५ ते २० पोलिसांचा ताफा होता. सायंकाळी उशिरापर्यंतच्या कारवाईनंतर केवळ कागदपत्रे नसल्याने १५ वाहने ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी ग्रामस्थांची बैठक घेऊन वाहनांची कागदपत्रे देण्याचे आवाहन करण्यात आले.
पर्यावरणाची हानी, महसूलही बुडतोय
तालुक्यात विविध ठिकाणाहून वाळू, दगड मातीची बेसुमार चोरी होत आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होतानाच सरकारचा महसूलही बुडत आहे.
...तर होईल कारवाई
- तालुका पोलिस ठाण्यात शेगाव दुमाला ग्रामस्थांची बैठक घेतली. वाहनधारकांना कागदपत्रे दाखवण्याचे आवाहन केले. कागदपत्रे दिल्यास कारवाई केली जाईल.”
गजानन गुरव, तहसीलदार, पंढरपूर
बातम्या आणखी आहेत...