आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानावर ढिगारे मुरूमाचे मुलांनी कुठे खेळायचे ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - होम मैदानावर अज्ञात लोकांनी प्रचंड प्रमाणात मातीचे ढिगारे टाकले आहेत. जवळ असणार्‍या शाळेचे विद्यार्थी क्रीडांगण म्हणून होम मैदानाचा वापर करत असतात. आता या मैदानाची दुरवस्था झाल्याने शालेय मुलांनी खेळण्यासाठी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, सफाई अधीक्षक आर. एम. तलवार यांनी मैदानावर जाऊन पाहणी केली. ‘होम मैदानावर बेकायदा मुरूम टाकण्यात आला आहे. तसा तो टाकता येत नाही. सुमारे 150 ते 200 डंपर मुरूम पडला असून, त्याबाबत झोन अधिकार्‍यांकडून खुलासा मागविण्यात येणार आहे’, अशी माहिती र्शी. तलवार यांनी दिली. मैदानावर दोन प्रकारचा मुरूम असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

खेळण्यास अडथळा
होम मैदानच्या परिसरातील सिद्धेश्वर प्रशाला, सिद्धेश्वर कन्या प्रशाला आणि ज्ञान प्रबोधिनी येथील विद्यार्थी या मैदानचा वापर खेळण्यासाठी करतात. याशिवाय शहरातील मुले खेळावयास येतात. मैदानाच्या एका बाजूस झोपड्या, दुसर्‍या, तिसर्‍या बाजूस मुरूम आणि आजोरा, चौथ्या बाजूस व्यवसायिक स्टॉल असल्याने खेळण्यासाठी जागा शोधण्याची वेळ मुलांवर आली आहे.

मैदानावरच का?
होम मैदान महापालिकेचे असून, येथे मुरूम टाकल्यास कोणी विचारणार नाही. पाया खोदल्यानंतर जवळच टाकल्यावर वाहतुकीचा खर्च कमी येतो. तीन ते चार डंपरने काम जलदगतीने करता येते.

बोट भलतीकडेच
होम मैदान भूमी व मालमत्ता विभागाच्या ताब्यात आहे. हा विभाग नगर अभियंता सुभाष सावस्कर यांच्या अख्त्यारित आहे. त्यामुळे प्राथमिक जबाबदारी असताना र्शी. सावस्कर आरोग्य विभागाकडे बोट दाखवत आहेत.