आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपसा केलेल्या वाळूची मोजणी करून अहवाल देण्याचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अरळी - सिद्धापूर येथील वाळू स्थळावरून किती वाळूचा उपसा करण्यात आला, याची मोजणी करून अहवाल देण्याचे आदेश जलि्हाधिकारी डाॅ. प्रवीण गेडाम यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिले. शविाय पुढील आदेश होईपर्यंत वाळू उपसा बंद ठेवण्यात यावा, असेही आदेशात म्हटले आहे. परवानगीपेक्षा अधिक वाळूचा उपसा केल्याप्रकरणी ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा अहवाल तहसीलदारांनी जलि्हाधिकाऱ्यांना दिला होता. प्रांताधिकारी श्रावण क्षीरसागर यांनीही असाच अहवाल दलिा होता. या पार्श्वभूमीवर जलि्हाधिकारी डाॅ. गेडाम यांनी या वरील आदेश दिले.

मंगळवेढा तालुक्यातील अरळी-सदि्धापूर येथील वाळूचा ठेका हिवरगाव येथील रघुराज नागणे यांनी घेतला होता. ठेकेदार नागणे यांना १ लाख २८ हजार ब्रास वाळू उपसा करण्याची परवानगी असताना त्यांनी १९ जुलैपर्यंत १ लाख ३४ हजार ब्रास वाळू उपसा केला असल्याचे तहसीलदारांच्या अहवालात म्हटले आहे. यानंतर प्रांताधिकारी यांनी वाळू स्थळाचा पंचनामा करून परवानगीपेक्षा अधिक वाळूचा उपसा केला असल्याचा अहवाल जलि्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. दोन्ही अहवालावरून जलि्हाधिकारी गेडाम यांनी ठेकेदार नागणे यांनी किती वाळूचा उपसा केला आहे, याची टोटल मशीनने मोजणी करावी, त्याचा अहवाल वेळेत सादर करावा. ही मोजणी होऊन अहवाल देईपर्यंत उपसा बंद करण्याचे आदेश दलिे आहेत. मोजणीमध्ये ठेकेदाराने अधिक वाळू उपसा केल्याचे निष्पन्न झाल्यास अधिक उपसा केलेल्या ब्रासनुसार दंड व अनामत रककम जप्तची कारवाई करण्यात येणार असल्याचे जलि्हाधिकारी गेडाम यांनी सांगितले.