आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेशी नाते जोडा; ते सांगेल का जगायचे : खरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- स्पंदन म्हणजे तरुणाई, स्पंदन म्हणजे जिवंतपणा हे आज येथे तुम्हा वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांसमवेत नक्की जाणवतेय. आज गुज सांगतो, एखाद्या कलेशी मैत्री जमवा. पोटाचा व्यवसाय तुम्हाला जगवेलच पण एखाद्या कलेशी जोडलेले नाते, हे का जगायचे हे सांगेल. प्रख्यात कवी संदीप खरे बोलत होते. तरुणाई हे शब्द मनात साठवत होती. येथील व्ही. एम. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘स्पंदन’ या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन कवी खरे यांच्या हस्ते झाले. यानंतर खरे बोलत होते.
अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे, डॉ. सुनील घाटे, डॉ. जी.ए. पंडित, डॉ. नीलिमा देशपांडे, विद्यार्थी प्रतिनिधी सचिन हके, नियतकालिकाचे संपादक ऋतुराज दिमदिमे, देवेंद्र औटी यांची प्रमुख उपस्थिती होती. र्शी. खरे यांची मधुरा घाटे व प्राची बिरंगणे यांनी प्रकट मुलाखत घेतली.
र्शी. खरे म्हणाले, ‘‘कविता , कला हे क्षेत्र काही खात्रीलायक व्यवसाय आज तरी नाही. पण दहा वर्षांचा असल्यापासून कविता लिहिण्याची उर्मी दाटून आली. पुढे लिहित गेलो.
र्कीती, यशर्शी धावतील
डॉ. नीलिमा देशपांडे फिरकी घेत म्हणाल्या की, वैद्यकीय शिक्षणानंतर तुमच्या मागे कीर्ती, यशर्शी धावणार आहेतच (हशा), त्याशिवाय समाधान व शांतीही मिळणार आहे. (प्रचंड हशा). भिंतीत खिळा ठोकीत डॉ. शिंदे म्हणाले, आमच्या लहानपणी आम्हीही कविता करायचो. आमच्या कविता कशा असायच्या. तू कोण उभा भिंतीत खिळा ठोकीत ! यासारख्या असायच्या. यावर मुलांनी पुढचे अजून सांगा, अजून सांगा असा कल्ला केला. पण पुढची कविता काही त्यांनी ऐकविली नाही.