आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाभार्थींना मिळणार आता रक्कम लगेच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘संजय गांधी’, ‘श्रावणबाळ’सह विविध कल्याण योजनांचे पैसे वेळेत मिळणार आहेत. लाभार्थींच्या खात्यावर रक्कम ‘आरटीजीएस’ (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टिम)ने भरण्यात येणार आहेत. यासाठी एकच दिवसाचा कालावधी लागणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना रक्कम मिळण्यात होणारी दिरंगाई संपेल. एप्रिल महिन्यातील रक्कम आरटीजीएसद्वारे जमा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे ४२ हजार, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेचे ५३ हजार, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे ३२ हजार, राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेचे २०० राष्ट्रीय विधवा योजनेचे हजार ५०० असे योजनांचे लाख ४२ हजार २०० लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना दरमहा कोटी ६४ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात येते.

आठ दिवसांचा कालावधी
पूर्वी: संजय गांधी, श्रावणबाळसह इतर योजनेतील लाभार्थ्यांना रक्कम मिळण्यासाठी ते १५ दिवसांचा कालावधी लागत होता. कोषागार कार्यालयातून तहसीलदारांच्या खात्यावर रक्कम जमा होणे. तेथून पुढे संबंधित बँकेला धनादेश लाभार्थ्यांची यादी पाठवणे आणि संबंधित बँकेतून उपशाखेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत होती. यामध्ये शासकीय सुट्या आल्यास आणखी विलंब होत होता.

एक दिवसाचा कालावधी
आता आरटीजीएस सिस्टिममुळे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे. कोषागार कार्यालयातून तहसीलदारांचे बँक खाते तेथून थेट संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी एक दिवसाचा कालावधी अपेक्षित आहे. रक्कम जमा झाल्यानंतर त्याच दिवशी लाभार्थ्यांना पैसे काढता येतील.

एप्रिलपासून लागू
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी संगायो, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना आरटीजीस सिस्टिमद्वारे अनुदान जमा करण्याचे आदेश दिले आहेत. एप्रिल महिन्याच्या मानधनापासून पद्धत लागू केली जाणार आहे. यासाठी आयएफएससी कोड बंधनकारक आहे.” अरुणागायकवाड, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना विभाग
बातम्या आणखी आहेत...