आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjeev Sadaphule News In Marathi,BSP, Solapur, Divya Marathi

शिंदे यांनी आंबेडकरी विचारांची केली प्रतारणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर - गेल्या 40 वर्षांच्या राजकारणात सुशीलकुमार शिंदे यांनी आंबेडकरी विचारांची प्रतारणा केली आहे. दलित असल्याचे सांगत आज जातीधर्माचे मेळावे घेऊन मते मागत आहेत. त्यांना धडा शिकवा, असे आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अँड. संजीव सदाफुले यांनी केले. मंद्रूप येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
सदाफुले म्हणाले, ‘गेली 60 वर्षे देशात काँग्रेसची सत्ता आहे. 40 वर्षांत शिंदे यांनी सोलापूरचे सिंगापूर करायला हवे होते. मात्र, शहर बकाल आहे. महिला सुरक्षित नाहीत आणि ते देशाचे गृहमंत्री म्हणून फिरतात. आता परिवर्तनाची लाट आली आहे. भाजपचे उमेदवार अँड. शरद बनसोडे हे दलित असले तरी त्यांचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे बसपच्या हत्तीचा विजय निश्चित आहे.’
बसपचे प्रदेश सचिव सुरेश तुरबे म्हणाले, ‘डॉ. बाबासहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत बनवण्याचे ध्येय बसपाचे आहे. देशात दलितांची सत्ता येण्यासाठी आणि मायावती पंतप्रधान बनाव्यात यासाठी बसपाला साथ द्या.’ याप्रसंगी तालुकाध्यक्ष सुहास सुरवसे, बलभीम कांबळे, चंद्रकांत शिंदे, प्रवीण कांबळे, इंद्रजित वाघमारे, अप्पा लोकरे यांच्यासह परिसरातील भंडारकवठे, विंचूर, कंदलगाव, गुंजेगाव, येळेगाव येथील कार्यकर्ते उपस्थित होते.
मंद्रूपला तालुका केला नाही
शिंदे यांनी मुख्यमंत्री असतानाही मंद्रूपला तालुका बनवला नसल्याची टीका माजी नगरसेवक बबलू गायकवाड केली. तसेच पाण्याचा प्रश्न सुटला नाही. एनटीपीसी प्रकल्प आणून डोक्याला ताप केला. अशा नेत्याला जागा दाखवा, असे आवाहन केले. तर आनंद चंदनशिवे यांनी तालुक्यात वाळूमाफियांचे राज्य आहे. त्यांना घालवण्याचे आवाहन केले.