आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गीत-संगीत विश्‍व : सोलापूरच्या संतोष देशमुख यांचा अल्बम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिझलर्सया ऑर्केस्ट्रा ग्रुपचे संचालक संतोष देशमुख यांनी सोलापूरच्या संगीतकारांना गायकांना संधी देत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा तुमच्यासाठी या गाण्यांचा अल्बम तयार केला आहे. विशेष म्हणजे या अल्बममध्ये दिग्‍गज गायक सुरेश वाडकर स्वप्नील बांदोडकर यांच्या मधाळ आवाजाची मोहिनी श्रोत्यांना ऐकावयास मिळणार आहे.

लहानपणापासूनच संगीताचे वेड
कायद्याचेशिक्षण घेतलेल्या संतोष देशमुख यांना संगीताचे वेड लहानपणापासूनच होते. हंुडा निर्मूलन समितीच्या निधीसाठी सोलापुरात मोठमोठ्या कलावंतांचे गाण्याचे कार्यक्रम सोलापुरात आणले जायचे. त्यावेळी संतोष यांच्या आई त्या समितीच्या अध्यक्षा होत्या. त्या समितीने आयोिजत केलेल्या विविध कार्यक्रमांनी संतोषच्या मनावर संगीताचे संस्कार केले. त्यामुळे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेऊनही आपल्या आवडीला व्यवसायाचे रूप दिले. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मोठे प्रयोग केले.

अल्बम कवी माधव पवार यांना भेट
कवीमाधव पवार यांच्या आशयघन कवितांवर काही तरी करावे, असे विचार संतोष यांच्या मनात आल्याने त्यांनी पवार यांच्या चार कवितांवर अल्बम तयार केला. तो दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लाँच होणार आहे. तो सप्रेम भेट म्हणून पवारांना समर्पित केला जाणार आहे.
असे केले काम
सोलापूरचेकवी माधव पवार यांच्या गीतांवर सोलापूरच्याच कंपोझर्स गायक यांना घेऊन अल्बम करण्याचा निश्चय केलेल्या संतोषने तुमच्याचसाठी फॉर दोज इन लव या नावाचा अल्बम तयार केला आहे. या अल्बममध्ये संगीतकार प्रशांत देशपांडे यांनी गझल फॉरमॅटमध्ये अंधार उजेड सारा हेे कंपोझिंग केले आहे. तर स्वप्नील नांगी या तरुणाने याच गीताचे युगलची वेगळी मांडणी कंपोझ केली आहे. त्यात चंद्रशेखर गाडगीळ सोलापूूरची युवा गायिका गौतमी जितुरी िहने गाणे गायले आहे. घन भरून आले हे गीत सुरेश वाडकर यांनी गायले असून त्याची चाल ही सोलापूरच्या विशाल सदाफ राहुल रणशृंगारे यांनी बांधली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण काम हे सोलापूरच्याच िसझलर्स साऊंड क्राफ्ट येथे झाले आहे. याशिवाय स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात प्रशांत देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेले गीत आले तारुण्य फुलूनी लवकरच गाणार आहेत.