आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरकी फिरकी...मोदींपेक्षा सनी लिऑनला पसंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लिऑन, नरेंद्र मोदी, सलमान खान,कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा, शाहरुख खान, पूनम पांडे, विराट कोहली या टॉप टेन यादीमध्ये सहा महिला आहेत. तुम्ही म्हणाल, यात काय विशेष महिला सर्वच क्षेत्रात अग्रभागी आहेत. होय आहेत नं, महिला सर्वच क्षेत्रात अग्रभागी आहेत. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सनी लिऑनने एका बाबतीत मागे टाकलेय. तुम्ही म्हणाल, कायतरीच काय ? पोर्नस्टार सनी लिऑन कुठे, पंतप्रधानाबरोबर कोणत्यातरी बाबतीत स्पर्धा होऊ शकेल काय? कारणही तसेच आहे. गुगलने आपला इअर इन सर्चेस अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्यात भारतातील टॉप टेन सर्च यादी जाहीर केली आहे. एका दिवसाची नव्हे संपूर्ण वर्षातील सर्चची सरासरी. आता बोला. भारतीयांनी गुगलवर सनी लिऑनला इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा जास्त वेळा सर्च केले कोहली आणि मोदी हेच केवळ या क्षेत्राबाहेरचे आहेत.
यावरही नेटिझन्सच्या प्रतिक्रिया आहेत. एकजण म्हणाला, लोकांना अशाच गोष्टीत जास्त रस असतो, नाहीतर बाजीरावाच्या पराक्रमापेक्षा त्याच्या प्रेमप्रकरणाचीच जास्त चर्चा झाली नसती. दुसरा म्हणाला, भारतीय लोक मूर्ख आहेत. एका पोर्न स्टारला एवढे महत्त्व का बर देताहेत ? नेटकरी लोकांत आंबट शौकीनच जास्त आहेत वाटतं?