आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळगोपाळांनी साजरी केली गोकुळाष्टमी, सरस्वती मंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - श्रीकृष्णाच्या वेषभूषेतील बालगोपाळ..राधाची अदा करणार्‍या चिमुकल्या.. बासरी घेऊन आलेला नटखट कन्हैय्या.. दहा फुटावर बांधलेली दहीहंडी.. गोविंदाच्या तालावर नाचत दहीहंडी फोडण्याचा आनंद.. हे दृश्य आहे सरस्वती मंदिर प्रशालेतील चिमुकल्यांचा.

गणपती घाट येथील सरस्वती मंदिर प्रशालेत चिमुकल्यांबरोबर गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. संध्या शिरसीकर आणि मानसी कुलकर्णी या शिक्षिकांनी गोकुळाष्टमीचे महत्त्व पटवून दिले. नेहा गोरा आणि मंजू स्वामी या शिक्षिकांनी कृष्णाची गाणी आणि भजने गायली. मुलांचे फेर धरणे आदी खेळ गीता बुर्ला आणि अमरजा वासकर यांनी घेतले. दुर्गेश कोळेकर या चिमुकल्याने दहीहंडी फोडली. नर्सरीच्या छोटा आणि मोठय़ा गटातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सहभाग होता. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष अँड. पांडुरंग देशमुख, कार्यवाहक रघुनाथ दामले, सदस्य मनीषा जोशी, मुख्याध्यापिका अरुणा कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमातील सजावटीचे काम शशिकला हळदे, शुभदा गोडबोले, र्शीदेवी जावळे आदी सेवकांनी केले.