आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarva Shiksha Abhiyan, Latest News In Divya Marathi

सोनवणेंसह चौघांवर गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिका प्राथमीक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना चहा, जेवण दिल्याची बोगस बिले सादर करून 1लाख 30 हजार 260 रुपयाचा अहपार केल्याप्रकरणी तत्कालीन प्रशासन अधिकारी, पर्यवेक्षक यांच्यासह चौघांवर शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.
शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी विष्णू कांबळे (रा. सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. तत्कालीन प्रशासन अधिकारी सत्यवान धर्मा सोनवणे, पर्यवेक्षक गौरीशंकर कल्लप्पा पाटील, साहाय्यक कार्यक्रम अधिकारी मधुकर एक़नाथ पाटील (रा. मार्डी), लेखपाल इब्राहिम बुडनसाब हुबळीकर (रा. सलगरवस्ती) यांच्या गुन्हा दाखल झाला असून अद्याप कुणाला अटक नाही. 22 जून ते 2 जुलै 2006 या कालावधीत ही घटना घडली आहे.
सर्व शिक्ष अभियानाअंतर्गत पहिली ते पाचवीतील शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना चहा व जेवण दिल्याची सोळा बोगस बिले सादर केली. त्याआधारे एक लाखाहून अधिक रकमेचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले होते. साहाय्यक फौजदार माने तपास करीत आहेत.