आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधव, नदाफ, कटारेंना 'सत्यशोधक' पुरस्कार जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापुरात होत असलेल्या दुसर्‍या राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलनात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा ‘सत्यशोधक’ पुरस्काराने सन्मान करणार असल्याची माहिती संयोजकांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. शिवछत्रपती रंगभवन येथे 9 आणि 10 फेब्रुवारीला हे संमेलन होत आहे. त्याची तयारी पूर्ण झाल्याचे स्वागताध्यक्ष युवराज चुंबळकर यांनी सांगितले.

सामाजिक, शैक्षणिक, उद्योग आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा गौरव करण्याचे ठरले आहे. त्यानुसार माजी महापौर डॉ. भीमराव जाधव गुरुजी (शिक्षण), अनिल वाघाडकर (सामाजिक), डॉ. अजीज नदाफ (साहित्य), किशोर कटारे (उद्योग), रंजना कोल्हे (आदर्श माता) यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे आणि सिंहगड इन्स्टिट्यूटचे संजय नवले यांचा विशेष गौरव करण्यात येणार असल्याचे मुख्य निमंत्रक प्रा. राजन दीक्षित यांनी पत्रकारांना सांगितले.

समारोपाला आठवले
सत्यशोधक ओबीसी परिषदेने आयोजित केलेल्या या संमेलनासाठी बड्या राजकीय नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. खासदार शरद यादव उद्घाटन सत्राला उपस्थित राहणार असून, समारोपाला रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले येणार असल्याचे र्शी. चुंबळकर यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी पाचला समारोप सत्रास सुरुवात होईल. त्यासाठी कर्नाटक मागासवर्ग महासंघाचे उपाध्यक्ष जी. के. सत्या, संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार उपस्थित राहणार आहेत.