आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुक्त गुडेवार यांच्याविरुद्ध पुन्हा सावस्कर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकाआयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी न्यायालयात खासगी याचिका दाखल करण्यात आली आहे. महापालिकेचे माजी नगरअभियंता सुभाष सावस्कर यांनी ही फिर्याद दाखल केली असून त्यावर फेब्रुवारी रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. गुडेवार हे आयुक्त म्हणून रूजू झाल्यानंतर सावस्कर निवृत्त होईपर्यंत मानसिक शारीरिक छळ करून जनमानसात बदनामी केली, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार खासगी फिर्याद दिली आहे. सावस्कर यांच्यावर बेकायदेशीर निलंबनाची कारवाई केली. २२ ऑक्टोबर २०१४ रोजी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ती पोलिसांनी घेतली आहे. अॅड. नंदकुमार दुरगुडे, अॅड. दीपाली पवार काम पाहात आहेत. या खासगी याचिकेमुळे आयुक्त गुडेवार सावस्कार वाद पुन्हा चर्चेला येणार आहे.

डॉ.कुमार यांचीही फिर्याद, शिवीगाळ केल्याचा आरोप
महापालिकाआयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याविरुद्ध मनपाचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद एम. कुमार यांनी न्यायालयात जातिवाचक शिवीगाळ केल्याची खासगी फिर्याद अॅड. विवेक शाक्य यांच्यातर्फे दाखल केली आहे. त्यावर फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.