आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृत्याविष्कारातून साकारले सावरकरांचे जीवनचरित्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रतिभासंपन्न कवी, चाफेकर बंधूंच्या हत्येनंतर स्वराज्याचे जाज्वल्य, मनी उफळून येणारी धग, लोकमान्यांना आराध्यदैवत मानणारे क्रांतिकारक, विज्ञाननिष्ठ सावरकर अशी विविध रूपे सोलापूरकरांना अनुभवास मिळाली.
सावरकर विचार मंचने जयंतीनिमित्त तेजोमय तेजोनिधी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बुधवारी सायंकाळी शिवस्मारक सभागृहाच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. नर्तिका धनर्शी आपटे व त्यांच्या पथकाने सावरकर रचित निवडक कवितांवर नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
विविध प्रेरणादायक गीतांवर नृत्य सादर करण्यात आले. या नृत्यातून सावरकरांच्या जीवनातील विविध पैलू, विविध प्रसंग मांडण्याचा प्रयत्न झाला. निवेदन प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर व विनया देसाई यांनी केले. या वेळी खासदार अँड. शरद बनसोडे, प्रशांत बडवे आदी उपस्थित होते.