आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SBC Will Protest For Students Educational Concessions At 15 July

‘एसबीसी’चा १५ जुलैला मोर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलतींसाठी १५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पद्मशाली ज्ञाती संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला. या प्रवर्गातील सर्व बांधवांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष जनार्दन कारमपुरी यांनी केले.
अनुसूचित जाती आणि जमातींच्या धर्तीवरच एसबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्यात आल्या आहेत. परंतु त्याचा प्रभावी अंमल होत नाही. शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क आदी माफ असताना, अडवणूक केली जाते. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी या सवलतीच बंद करण्यात आल्या. जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने महाविद्यालये शैक्षणिक शुल्काची मागणी करतात. दुसरीकडे पडताळणीसाठी जाचक अटी करून ठेवण्यात आल्या. या सगळ्या बाबींचा सामना करताना विद्यार्थी पालक चिंताक्रांत होऊन जातात. परिणामी या विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हा मोर्चा असल्याचे श्री. कारमपुरी यांनी म्हटले आहे.
आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी शुक्रवारी कन्ना चौकातील मद्दा मंगल कार्यालयात प्राथमिक बैठक झाली. त्यासाठी एसबीसी कृती समितीचे सरचिटणीस अशोक इंदापुरे, पद्मशाली फाउंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल, जय मार्कंडेय संघटनेचे अशोक बल्ला आदी उपस्थित होते. ज्ञाती संस्थेचे सरचिटणीस सत्यनारायण गुर्रम यांनी आभार मानले.