आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार खरेदीसाठी जागेवर कर्ज; स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेगा शो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेगा कार शोचे उद्घाटन विभागीय व्यवस्थापक डी. व्ही. गुट्टे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. नऊ नामांकित कंपन्यांच्या सर्व मॉडेल्सच्या कार उपलब्ध आहेत. जागेवरच कर्ज मंजुरी मिळणार आहे. 500 रुपये प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रात देण्यात येत असल्याचे गुट्टे यांनी सांगितले.

होम मैदान येथे 17 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत शो असणार आहे. 10.45 टक्के व्याजदराने 85 टक्के कर्ज दिले जाणार आहे. प्रती लाखास 1683 रुपये दरमहा हप्ता आहे. ग्राहक सिद्धेश्वर हिप्परगी यांना मारुती कारची तर सचिन पवार यांना ह्युंदाई कारची चावी विभागीय व्यवस्थापक डी. व्ही. बुट्टे यांच्या हस्ते देण्यात आली.

मुख्य व्यवस्थापक प्रसाद घैसास यांनी प्रास्ताविक केले. विभागीय कार्यालय ग्रामीण व्यवस्थापक महेश वझे, कोषागार शाखेचे र्शीनिवास राव, इंडस्ट्रियल शाखेचे सनमुख सोरडे, कृषी मुख्य शाखेचे सुभाष भाले, स्टेशन रोड शाखेचे हरिदास सुर्वे, अरविंदकुमार, जनरल इन्शुरन्सचे संजय झंवर, चव्हाण मोटर्सचे मुख्य अधिकारी फ्रांन्सिस, आरएनए इव्हेंटचे राही व नितीन आरसीद उपस्थित होते. अर्पिता खडकीकर यांनी सूत्रसंचालन केले.