आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल झाला ऑनलाइन जाहीर, पूर्वसूचना देता निकाल जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला.
हा निकाल कोणतीही पूर्वसूचना देता जाहीर झाल्याने निकालाविषयी पालक, शिक्षक अनभिज्ञ होते. निकालावर हरकती नोंदवण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यातून पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ४४ हजार ३४ तर माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २५ हजार ११७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
संकेतस्थळावर पाहा निकाल
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २२ मार्चला घेतलेल्या पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर झाला आहे. परिषदेच्या www.msshss.in आणि www.mscepune.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
आता लक्ष अंतिम निकालाकडे
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास किंवा उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत हवी असल्यास परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला आहे. शिवाय, परिषदेकडे टपाल खात्याच्या माध्यमातून आवश्यक ते शुल्क भरून १५ जूनपर्यंत अर्ज पाठवता येऊ शकतील. या प्रक्रियेनंतर शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर होईल. तेव्हाच शिष्यवृत्ती कोणाला हे कळू शकणार आहे.
जिल्हा निहाय निकाल नसल्याने संभ्रम
निकालजाहीर करताना गुणवत्ता यादी तसेच जिल्हानिहाय विवरण जाहीर करण्यात आले नसल्याने शिक्षण विभागातही निकालाविषयी संभ्रम आहे. निकालावर हरकती मागवण्यात आल्या असून, त्यांचा निपटारा झाल्यावर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
दुरुस्तीसाठीची प्रक्रिया
विद्यार्थ्याच्या नावात, आडनावात, वडिलांच्या नावात, आईच्या नावात, शहरी वा ग्रामीण, अभ्यासक्रम, जात आदींबाबत दुरुस्ती करावयाची असल्यास त्या विषयीचे अर्जही शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत परिषदेकडे पाठवणे गरजेचे आहे.
गुणवत्ता यादी लवकरच
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ऑनलाइन निकाल जाहीर केला आहे. मात्र, गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही. अंतिम गुणवत्ता यादी नंतर जाहीर करण्यात येणार आहे. पालकांसह विद्यार्थ्यांना निकालावर हरकती नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.”
राजेंद्र बाबर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग
बातम्या आणखी आहेत...