आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scholarships Online Application Date Increase Issue

शिष्यवृत्तीच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ, आता ३१ जानेवारीची तारीख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभागाच्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र, अर्ज भरताना सर्व्हर डाऊन किंवा पासवर्ड िरलॉिगन होत नसल्याच्या समस्या उद्भवत आहेत. समाज कल्याण विभाग तांत्रिक अडचणी सोडविण्यापेक्षा तारीख पे तारीख वाढवत आहे.

शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी शिष्यवृत्तीचे (नवीन नूतनीकरण), राजर्षी शाहू महाराज विद्यावेतन आणि परराज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासन शिष्यवृत्तीचे अर्ज करण्याची मुदत ३१ डिसेंबरला संपली होती. ती १५ जानेवारीपर्यंत वाढवली होती. आता पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आणखी किती वेळा मुदतवाढ देणार असा प्रश्न आहे.

आतापर्यंत केवळ ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. आणखी हजारो विद्यार्थी ऑनलाइन अडचणीमुळे अर्ज भरू शकले नाही. अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी होत्या. त्यामुळे अर्ज सादरीकरणासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी अनेक राजकीय, सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ म्हणजे ३१ जानेवारी २०१५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

तांत्रिक अडचण
-अर्जभरण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या दूर करण्याचे काम राज्यस्तरावरील यंत्रणेवरून चालू आहे. त्यामुळे मुदतवाढ दिली आहे. अडचणी असल्यास साहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय भवन, सात रस्ता (०२१७-२७३४९५०)येथे संपर्क साधावा.” मनीषाफुले, सहायक आयुक्त, समाज कल्याण

सर्व्हर डाऊन
-शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरताना कागदपत्रे अपलोड होत नसल्याने सायबरचालकही कंटाळा करतात. काही वेळा वेबसाइट व्यवस्थित चालत नाही. विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. महिन्यापासून अर्ज भरत आहे. महाविद्यालयाशी संपर्क केल्यास माहिती नसल्याचे उत्तर मिळते.” संगपाल शिंदे, विद्यार्थी

किचकट प्रक्रिया
अर्जभरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या वर्षापासून विद्यार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. मात्र, कागदपत्र अपलोड होत नसल्याने अर्ज भरले जात नसल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना मोठा मनस्ताप होत असून, सायबर कॅफेवर तासाप्रमाणे पैसेही मोजावे लागत आहेत. तसेच प्रत्येक प्रमाणपत्राच्या स्कॅनिंगपोटी पाच रुपयांचा भुर्दंडही त्यांना सहन करावा लागतो आहे.

२० दिवस लागले
-सोलापूर विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. करत आहे. पूर्वी सोलापूर विद्यापीठ पीएच.डी.चा ऑप्शन येत नव्हता. त्यानंतर प्रक्रिया खूप किचकट होती. कागदपत्र स्कॅन करणे आदी गोष्टींमुळे २० दिवस लागले” अजितगायकवाड, विद्यार्थी