आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scholorship Fraud In Solapur News In Divya Marathi

शिष्यवृत्ती अपहार प्रकरणात दोन महिलांना न्यायालयीन, तर एका महिलेला पोलिस कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्रशासनातर्फे मागासर्वीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती अपहारप्रकरणी अटकेत असलेल्या दोन महिलांना न्यायालयीन तर एकास १५ जूनपर्यंत मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत भोसले यांनी पोलिस कोठडी सुनावली आहे.
बी. ए. ते मेडिकल, इंजिनिअरिंग आदी विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपाचे काम राज्य शासनाकडून मास्केट या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. त्या कंपनीकडून संगणक विभागात काम करणाऱ्या काहींनी संगनमत करून बनावट नावे या शिष्यवृत्ती यादीत घातली. त्यांच्या नावाने पैसे परस्पर काढून घेतले जात होते. हा प्रकार २०११ पासून सुरू होता. याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर तपासचक्रे फिरली. संगणक आॅपरेटर म्हणून काम करणाऱ्या स्मिता साळुंखे, सोनल पांडे (दोघीही राहणार सोलापूर) दोन महिलांना अटक झाली होती. त्यानंतर सारिका दत्तात्रय काळे (रा. जुनी मिल चाळ, हल्ली नवीन आरटीओ कार्यालयाजवळ, सोलापूर) यांना अटक झाली आहे. हा अपहार प्रथमदर्शनी एक कोटी १७ लाख ९६ हजार १७८ रुपयांचा आहे. जून रोजी सदर बझार पोलिसात समाज कल्याण विशेष साहाय्यक अधिकारी मनीषा फुले यांनी फिर्याद दिली आहे. अटक केलेल्या साळुंखे पांडे यांनी गुरुवारी जामीनसाठी अर्ज केला. यावर न्यायाधीशांनी सरकारी वकिलांचे तपासी अधिकाऱ्यांचे म्हणणे मागविले आहे. याप्रकरणी काळे यांच्याकडून अॅड. मिलिंद थोबडे तर सरकार पक्षाकडून अॅड. नाईकवाडे काम पाहत आहेत.