आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय शिक्षणासाठी वापरले जातेय हायटेक तंत्रज्ञान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - पूर्व विभागातील पद्मशाली शिक्षण संस्थेच्या राजमल बोमड्याल प्राथमिक शाळेत लॅपटॉपच्या आधारे पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तकाशिवाय कल्पकतेने शिक्षण दिले जात आहे. अभ्यासक्रम, गोष्टी, त्यांची रोजची हजेरी, त्यांचे रोजचे पूर्ण करावयाचे धडे, गणित सगळे काही शिक्षक लॅपटॉपवर करतात. यंदाच्या वर्षापासून सुरू केलेल्या वेगळ्या उपक्रमाला शिक्षकांनी स्वत:च्या खर्चातून व संस्थेनेही काही मदत केली आहे.

असे आहे वेगळेपण
शिक्षकांना शाळेत किंवा वर्गावर जाताना पुस्तक न्यावे लागत नाही. हजेरी एक्सलशीटमध्ये असल्याने मुलांच्या प्रगतीचे, त्याच्या शाळेत येण्या-जाण्याचे दिवस, वेळ आदी गोष्टी अपडेट राहतात. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयाच्या व क्लिप्स मुख्याध्यापक व्यंक टेश कोटाबत्ती यांनी तयार करून घेतल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी कितपत अपडेट झाले आहेत हे शिक्षकांच्या लक्षात येते. तसेच कार्यक्रमांचे नियोजनही त्यावरच केले जाते.

शिक्षकांनीही घेतले धडे
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी शाळेतील 28 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी उन्हाळ्याच्या सुटीत खास शिबिर घेण्यात आले. शिक्षकांना एक्सेल, पॉवर पाइंट आदी प्रोग्रामची ओळख करून देण्यात आली. इंटरनेटच्या माध्यमाने चित्रफिती गोष्टींच्या सिरिज असे विविध प्रकार शिकविले.

विद्यार्थी आवडीने शिकतात
विद्यार्थांच्या कलेने शिकवले की ते आपल्या आवडीनिवडीतही बदल करतात. हे लक्षात आले. कथा सांगण्याच्या तासात मुले आतुरतेने क्लिपिंगची वाट पाहतात. शिक्षण वेगळे असल्याचे ते जाणून घेतात. अभ्यास क रण्याच्या वेळेत आणि दृष्टिकोनात बदल झाला आहे.’’ संध्या नादर्गी, शिक्षिका

नवे आत्मसात करण्याचा ध्यास
हजाराच्यावर विद्यार्थी असलेल्या आमच्या शाळेत लॅपटॉपवर दिल्या जाणार्‍या शिक्षणाची आवड लागली आहे. त्यांच्या या गोडीसाठी आम्ही सर्व शिक्षक, संस्था आणि सगळ्यांच कर्मचार्‍यांनी कष्ट घेतले आहेत. ही प्रणाली मुलांना आवडली हे लक्षात आले. आमचे क ष्ट फळास आल्याचे समाधान वाटले.’’ व्यंक टेश कोटाबत्ती, मुख्याध्यापक, बोमड्याल प्राथमिक शाळा