आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Education News In Marathi ,Syllabus, Divya Marathi, Student, Solapur

यंदाच्या वर्षापासून तिसरी, चौथी आणि पाचवीसाठी नवीन अभ्यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शालेय वर्ष 2014-2015 या वर्षात इयत्ता 3 री, 4 थी व 5 वीसाठी नवीन अभ्यासक्रम येणार आहे. या पुनर्रचित प्राथमिक अभ्यासक्रमांतर्गंत बदलणार्‍या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान व ज्ञानाचा नवीन खजिना उपलब्ध होणार आहे. शिवाय शिक्षणाबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रमावर भर देण्यात येणार आहे. इतिहास, भूगोल आणि विज्ञान मिळून परिसर अभ्यास हा विषय नव्याने अभ्यासक्रमात येणार आहे. तर प्राथमिक शाळांमधील मुलांना पाठांतरापेक्षा सहज अकलन होईल अशा अभ्यासक्रमावर भर आहे. त्या दृष्टिकोनातून बालभारतीतर्फे अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे.

बालकांचा मोफत शिक्षक हक्क नियमान्वये 2013 पासून इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलण्यास सुरुवात झाली आहे. किमान 8 ते 10 वर्षांनी अभ्यासक्रम बदलायला हवा असा शासनाचा अध्यादेश आहे.

गेल्या वर्षी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलला होता. त्यासोबत दहावीचाही अभ्यासक्रम बदलला. जुन्या नियोजनाप्रमाणे यंदा तिसरी, पाचवी आणि सातवीचा अभ्यासक्रम बदलणार होता. मात्र त्यात बदल केला असून दुसरीनंतर सलग पुढील वर्गाचा अभ्यासक्रम बदलण्याच्या उद्देशाने नियोजनात सुधारणा केली आहे. तसेच लेखी आदेश शिक्षण विभागांना देण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे
2013 पासून मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यान्वये इयत्ता पहिली ते आठवीचा अभ्यासक्रम बदलण्यास सुरुवात झाली.
08 ते 10 वर्षांनी अभ्यासक्रम बदलण्याचा शासन अध्यादेश आहे.
2015-16 या वर्षात सहावी, सातवी, आठवी या वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार आहे.

नवीन अभ्यासक्रमाचे स्वागत
मुलांना नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तके म्हटले की एक वेगळाच आनंद असतो. बदलणार्‍या जगाप्रमाणे मुलांनाही नवीन शिकायला मिळते. त्याचे आम्ही स्वागतच करीत आहोत. सर्मथ साळुंखे , पालक

पाठय़पुस्तक महामंडळ नवीन अभ्यासक्रम बदलते. मात्र त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देत नाही. अभ्यासक्रम बदलाल तर तुम्हीच शिकवा, अशा प्रकारची भूमिका प्रशासन घेत असल्याचे दिसून येते. विनोद कांबळे, शिक्षक

पुस्तके छपाईचे काम सुरू आहे. 15 दिवसांत काही विषयाची पुस्तके बाजारात येतील. नवीन अभ्यासक्रमात व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून बदल करण्यात आला. विद्यार्थ्याच्या कल्पकतेत वाढ होईल. ए. बी. गायकवाड, व्यवस्थापक, पाठय़पुस्तक मंडळ, पुणे

पुढील वर्षीही बदलणार
2015- 16 या वर्षात सहावी, सातवी आणि आठवी या वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार आहे. याबाबतचे नियोजन बालभारतीतर्फे सुरू आहे. नवीन अभ्यासक्रमात परिसर अभ्यास नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. त्यात विज्ञान, भूगोल परिसर अभ्यासाचा समावेश केला आहे.
इयत्ता तिसरी : जुना : मराठी, गणित, इंग्रजी, इतिहास, भूगोल, विज्ञान.
नवीन : मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास (जिल्हा भूगोल समाविष्ट)
इयत्ता चौथी : जुना : मराठी, गणित, इंग्रजी, इतिहास, भगोल, विज्ञान
नवीन : मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास (जिल्हा भूगोल समाविष्ट)
इयत्ता पाचवी : जुना : मराठी, गणित, इंग्रजी, इतिहास , विज्ञान, भूगोल, हिंदी
नवीन : मराठी, गणित, इंग्रजी, हिंदी, परिसर अभ्यास (जिल्हा भूगोल समाविष्ट)