आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Of Marketing,Latest News In Divya Marathi

पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षक करताहेत मार्केटिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- खासगी शाळांनी उन्हाळी सुटी संपण्यापूर्वीच पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांनी कॅम्पेनिंगला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत जास्तीत जास्त मुले आपल्या शाळेत कसे आणता येईल यासाठी शिक्षक मार्केटिंग करण्यात व्यग्र झाल्याचे चित्र आहे.
पहिल्याच दिवशी प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्यांना शाळेकडे आकर्षित केले जाईल. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहर परिसरात कोणत्या ठिकाणी शाळेला येणारी मुले आहेत, त्यांची नावे समाविष्ट करून त्यांना विविध प्रकारची प्रलोभनेही दाखवण्यात येत आहेत. गेल्या महिनापासूनच शिक्षकांनी परिसराचा सव्र्हे सुरू केला आहे.
शाळेत दाखल होणार्‍या मुलांची माहिती घेणे, पहिलीयोग्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन पालकांची भेट घेणे यासाठी शिक्षक स्वत:हून प्रयत्नशील आहेत. काही शाळांनी पहिल्या दिवशी मुलांना खाऊ वाटप करून तर काही ठिकाणी मिरवणुकीने मुलांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त मुले आपल्याच शाळेत येतील यासाठी शिक्षक प्रयत्न करत आहेत. शिक्षकांवर संस्थाचालकांचाही दबाव असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर पट वाढला तर अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मिटेल, यासाठी शिक्षक स्वत:हून पट वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.