आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेब्रुवारीमध्ये करावी लागणार नर्सरी पहिलीची प्रवेश प्रक्रिया, मोफत प्रवेश ऑनलाइन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित घटकातील विद्यार्थ्यांना नर्सरी आणि पहिल्या वर्गामध्ये नामांकित शाळांत प्रवेश घेता यावा, त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, संस्थाचालकांच्या मनमानीमुळे आणि शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. या घटकातील राखीव ठेवण्यात आलेल्या सर्व जागांवर प्रवेश मिळावेत यासाठी शिक्षण विभागाने २०१५-१६ पासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणार आहे.

मोफत सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार कायम विनाअनुदानित शाळा वगळता इतर सर्व शाळांमध्ये नर्सरी किंवा इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थी क्षमतेनुसार २५ टक्के मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. २००९ पासून या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, दरवर्षी अनेक शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश होत नसल्यामुळे वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थी नामांकित शाळांमध्ये प्रवेशापासून वंचित राहत आहेत. मार्च महिन्यामध्ये शिक्षण विभाग प्रवेश प्रक्रिया राबवते. त्यासंदर्भात जाहिरात करणे आवश्यक असताना कोणतीही जाहिरात काढता प्रवेश प्रक्रिया राबवल्या जात असल्यामुळे पालकांच्या अनभिज्ञतेमुळे अनेक प्रवेश होत नाहीत. त्याचा फॉलोअपही शिक्षण विभाग घेत नसल्यामुळे दरवर्षी जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे यंदापासून हे प्रवेश ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यापासून सुरू आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या पसंतीच्या शाळेच्या संपर्कात राहण्याची गरज आहे.

कायदा काय म्हणतो : पूर्वीशाळा, घराच्या अंतराची अट होती. पण, २४ मे २०१२ ला सुधारित नियमात ती शिथिल केली. यामुळे अंतराचे कारण दाखवत विद्यार्थांना प्रवेश नाकारता येत नाही. पालकांचे उत्पन्न एक लाख असावे, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थांना उत्पन्नाची अट नाही. पण, इतर संवर्गासाठी उत्पन्नाची अट आहे.

नर्सरी किंवा पहिलीमध्ये मिळणार प्रवेश : ज्याशाळांमध्ये नर्सरीपासून वर्ग आहेत अशा शाळांमध्ये नर्सरीमध्ये, तर ज्या शाळांमध्ये नर्सरी नसेल अशा शाळांमध्ये पहिलीच्या इयत्तेत प्रवेश मिळणार आहेत. मात्र, यंदाच्या २०१४-१५ या शैक्षणिक वर्षामध्ये नर्सरीत प्रवेश देता येत नसल्याची दिशाभूल करून अनेक शाळांनी प्रवेश नाकारले होते. आता प्रवेश मिळणार आहेत.

प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता येईल
-यावर्षीपासून सर्व प्रवेश ऑनलाइन होणार आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता येईल. यासंदर्भातील निर्णय झाला असला तरी अद्याप प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम आला नाही. पण, फेब्रुवारीपासून कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता आहे.'' राजेंद्रबाबर, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

शिक्षण खर्च शासन करणार
२५टक्के राखीव जागांतून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च शासन उचलते. अशा सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क आणि इतर शुल्क शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळांना दिले जाते. मात्र, या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांकडून जादा शुल्क वसूल करता येत नसल्यामुळे संस्थाचालकांना प्रवेश देणे परवडत नसल्यामुळे अनेक त्रुट्या काढून प्रवेश नाकारण्यात येतात.