आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Reservation Issue For A KG To 1st Slandered

केजी ते पहिलीसाठी २५ % आरक्षण प्रवेशाची लॉटरी २८ एप्रिलला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केजी ते पहिलीसाठी २५ टक्के आरक्षणातंर्गत दुर्बल वंचित घटकांसाठी राबविण्यात आलेली ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शहरातील २३ खासगी शाळांमध्ये आरक्षण आहे. येत्या २८ एप्रिल रोजी नूतन मराठी विद्यालय सभागृह, ज्ञानप्रबोधिनी प्रशालेजवळ सकाळी १० वाजता लॉटरी काढण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिली.
१६ मार्चपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. एकूण अर्ज १५४४ आले होते. त्यापैकी पात्र अर्ज ४२३ आहेत. अपात्र अर्ज ११२१ आहेत. आरक्षित प्रवेशांची संख्या ५०० च्या जवळपास आहे. त्यामुळे आलेल्या पात्र अर्ज कमी आले. सोलापूरमध्ये प्रथम आॅनलाइन प्रवेशाची प्रक्रिया घेण्यात आली हेाती. त्यामुळे याचा फटकाही थोड्या प्रमाणात प्रवेश प्रक्रियेला बसला आहे.

ऑनलाइन लाॅटरी होणार
ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदापासून सुरू झाल्याने लॉटरी पद्धतही ऑनलाइन होणार आहे. त्यासाठी एकाच दिवसात पालकांच्या समोरही लाॅटरी काढण्यात येणार आहे. गेल्या वर्षी चिठ्ठी काढून प्रवेश देण्यात आला होता.

पालकांनी उपस्थित राहावे
२५टक्के प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पालकांनी २८ एप्रिल रोजी हजर राहावे. प्रवेश प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी एकाच सभागृहात ही लाॅटरी पद्धत ठेवण्यात आली आहे. प्रवेशात एकसूत्रता आणण्यासाठी ही पद्धती शासनाच्या आदेशाप्रमाणे पूर्ण करण्यात येईल.” विष्णूकांबळे, प्रशासनाधिकारी