आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - मागील वर्षीच्या तुलनेत शालेय साहित्याचे दर सुमारे 15 टक्क्य़ांनी वाढलेले आहेत. महागाईच्या या कात्रीमुळे वह्यांची पाने कमी झाली आहेत. दोनशे पानांची म्हटली जाणारी 192 पानांची वही 172 पानांवर आली आहे. तरीही विक्रीत मात्र, घट झालेली नाही. शाळेसाठी या वस्तू आवश्यक असल्याने ग्राहकांकडून खरेदी केली जाते, असे दुकानदारांनी सांगितले.
शाळा 17 जूनपासून सुरू होत आहेत. महागाईचा फटका व पेट्रोल डिझेलची दरवाढ, परिणामी वाहतुकीचा वाढलेला खर्च, कागदाच्या वाढत्या किमती यामुळे यंदा शालेय साहित्य महागले आहे. वह्या, पुस्तके, पेन्सिल, कंपास, दप्तरे यासह इतर साहित्याच्या किमती 10 ते 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जकात बंद करून एलबीटी लागू केली तरी त्यामुळे किमतीमध्ये फरक पडला नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कागदाच्या किमती वाढल्याने वह्यांच्या किमती वाढल्या आहेत. परंतु, दर अधिक वाढू नये म्हणून पानांची संख्या कमी करण्यात आली आहे. पूर्वीची 192 पानी वही आता 172 पानी झाली आहे. किमतीत वाढ होऊ नये म्हणून उत्पादकांकडून जादा वस्तुरूपात व्यापार्यांना मिळणार्या स्किम कमी केल्या आहेत. पेन्सिलच्या खर्चातही 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 30 रुपयांना मिळणार्या वहीची किंमत 35 रुपये झाली आहेत. दप्तराच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी किरकोळ वाढ झाली आहे.
हे बाजारात दाखल
नव्याने बदललेल्या अभ्यासक्रमांची पुस्तके दुकानात दाखल झाली आहेत. याबरोबरच नवनवीन मॉडेल्सच्या कंपास पेट्या, सॅक, वह्या आदी साहित्यांनी दुकाने फुलली असून, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढत आहे. बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये पहिली, दुसरी, दहावी, अकरावी आदी वर्गातील पुस्तके दुकानामध्ये आली आहेत.
20 ते 30 टक्क्यांनी वाढ
कागदाची कि मत वाढली, छपाईचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे यंदा शालेय साहित्याच्या किमतीमध्ये 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांचा प्रतिसादही कमी आहे.’’ संजय कुंदूर, सरस्वती बुक डेपो
साहित्याच्या किमती
साधी वही : 150 - 350 रुपये (प्रति डझन)
फुलस्केप : 360 -460 रुपये (प्रति डझन)
कंपास : 30 ते 120 रुपये (प्रति नग)
पेन्सिल : 25 ते 50 रुपये (प्रति बॉक्स)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.