आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात शाळा तपासणी: पटपडताळणीत 7 हजार 328 विद्यार्थ्यांची तफावत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोलापूर- सोलापूर शिक्षण मंडळाच्या वतीने 7 ऑक्टोबर रोजी अचानक केलेल्या पटपडताळणीत एकूण 7 हजार 327 विद्यार्थ्यांची तफावत आढळून आली आहे. यामध्ये एकाही शाळेमध्ये 100 टक्के उपस्थिती आढळली नाही. ऑगस्ट महिन्यातील पटपडताळणीपेक्षा सध्याचा पट अधिक असला तरी एकूण विद्यार्थी व प्रत्यक्ष पटावरील विद्यार्थ्यांमध्ये 7 हजार 327 जणांची तफावत आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) कमी पट असलेल्या शाळांच्या मान्यतेबाबत प्रo्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही पटपडताळणी क्रॉसचेक करण्यात आली होती. ज्या शाळांचा पट कमी आहे, त्या शाळांना नोटीस बजावण्यात येणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पटपडताळणीत एकूण 9 हजार 430 इतकी ताफावत आढळली होती. त्यानंतर सर्व शाळांना पट अंतिम करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 7 ऑक्टोबरला झालेल्या पटाच्या आधारावर पुढील शाळांचे भविष्य अवलंबून राहणार आहे.

काही शाळांची तपासणीच राहिली
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात आलेल्या पटपडताळणी आणि 7 ऑक्टोबरच्या पटांमध्ये 2 हजारांनी वाढ झाली आहे. 9 हजार 430 वरून 7328 इतका पट आढळून आला. या वेळी 2102 विद्यार्थ्यांनी वाढला असला तरी काही शाळांची पाहणीच झालेली नाही. तरीही 7328 इतकी विद्यार्थी पटामध्ये ताफावत आहे.

शंकास्पद शाळेत इनकॅमेरा तपासणी
एकाच दिवशी सर्व शाळांमध्ये इनकॅमेरा पटपडताळणी करणे शक्य नव्हते. तेवढे कॅमेरेही आमच्याकडे उपलब्ध नाहीत. पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ पथकात होते. यापुढे मात्र ज्या शाळांमध्ये शंकास्पद पटसंख्या असेल त्या ठिकाणी इनकॅमेरा पटपडताळणी करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणच्या शाळांमध्ये तफावत आढळली आहे, त्यांना त्वरित नोटीस पाठवणार आहे.
- विष्णू कांबळे , प्रशासन अधिकारी, मनपा शिक्षण मंडळ